बाबो! Kim Jong-un यांचा नवा आदेश; उत्तर कोरियामध्ये Mullet Haircut, Ripped आणि Skinny Jeans, नाक व ओठ टोचण्यावर बंदी
याशिवाय आभूषणे घालण्यासाठी नाक व ओठ टोचणे यावरही बंदी आहे. कपड्यांमध्ये स्किनी जीन्ससोबत फाटलेली जीन्स घालण्यावरही बंदी आहे.
उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) आपल्या विचित्र निर्णयामुळे प्रसिद्ध आहे. तसेच त्याच्याकडून दिल्या गेलेल्या शिक्षाही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता किम उम जोंगने आपल्या देशातील लोकांवर आणखी एक निर्णय लादला आहे व सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. किम जोंग याला अशी भीती वाटत आहे की, देशातील तरुण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली येत आहेत. म्हणूनच आता त्याने उत्तर कोरियामध्ये मुलेट हेअरकट (Mullet Haircut) आणि स्कीनी जीन्स (Skinny Jeans) घालण्यावर बंदी घातली आहे. उत्तर कोरियाचे वृत्तपत्र द रोंडॉंग सिनमूनने ही माहिती दिली.
महत्वाचे म्हणजे देशात मुलेटसह इतरही अनेक हेअरकटवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या देशात केवळ 15 प्रकारच्या हेअरस्टाईलना परवानगी दिली गेली आहे. उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उन याचा असा विश्वास आहे की, पाश्चात्य संस्कृतीमुळे उत्तर कोरियाचे पतन होऊ शकते. डेली मेलच्या अहवालानुसार एका सरकारी वृत्तपत्राने दावा केला आहे की, किम जोंग-उनला असे वाटते की भांडवलशाहीच्या जीवनशैलीचे परिणाम थांबविण्यासाठी काही केले नाही तर देश एखाद्या 'दुर्बल भिंतीप्रमाणे' कोसळेल. म्हणूनच आता त्याने तरुणाईवर अनेक निर्बंध घातले आहेत.
केस रंगवणे किंवा स्पाईक हेअरस्टाईल ठेवणे यावरही बंदी घातली आहे. याशिवाय आभूषणे घालण्यासाठी नाक व ओठ टोचणे यावरही बंदी आहे. कपड्यांमध्ये स्किनी जीन्ससोबत फाटलेली जीन्स घालण्यावरही बंदी आहे. येथे फॅशनशी संबंधित वस्तूंवरील निर्बंध देशात लागू होणाऱ्या नव्या कायद्यांतर्गत येतील. परकीय संस्कृतीला आळा घालण्यासाठी दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध के-पॉप बँडवरही बंदी आहे. (हेही वाचा: Albert Einstein ने लिहिलेल्या प्रसिद्ध E=mc2 सूत्राच्या पत्राचा लिलाव; कोट्यावधी रुपयांना विकले गेले हस्तलिखित)
उत्तर-कोरियाच्या नेत्याने यापूर्वी प्योंगयांगच्या रूग्णालयात चिनी औषधावर बंदी घातली होती, कारण चिनी बनावटीच्या Cocarboxylase औषधाच्या सेवनाने एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. उत्तर कोरियामधील सत्तारूढ कामगार पक्षाच्या मालकीच्या वृत्तपत्राने गुरुवारी लिहिले की, 'देशाला एखाद्या भिंतीप्रमाणे कोसळू द्यायचे नसेल तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल.’