Muslim Tell Hindu Classmates To Convert: ब्रिटनमधील हिंदू मुलांवर मुस्लिम वर्गमित्रांचा धर्मांतरासाठी दबाव; अन्यथा दिल्या जात आहेत नरकाच्या धोक्यांचा सामना करण्याच्या धमक्या
यासह एका विद्यार्थ्याला हिंदूविरोधी गुंडगिरीमुळे पूर्व लंडन येथे तीन वेळा शाळा बदलाव्या लागल्या होत्या. हिंदू विद्यार्थ्यांवरील आठ शारीरिक हल्ल्यांचे तपशील समोर आले होते.
लंडनस्थित (London) थिंक टँकच्या म्हणण्यानुसार, यूकेमधील हिंदू विद्यार्थी त्यांच्या वर्गात गुंडगिरी आणि वांशिक भेदभावाचे (Racial Discrimination) लक्ष्य ठरत आहेत. वर्गातील इतर मुस्लिम विद्यार्थी या हिंदू मुलांना धर्म बदलण्यास सांगत आहेत. टेलीग्राफने हेन्री जॅक्सन सोसायटीच्या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की, मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदूंना धर्मांतर करण्याचे आवाहन केले आहे, नाहीतर 'काफिर' सारख्या शब्दांचा वापर करून 'नरकात जाण्याच्या' धमक्या दिल्या जात आहेत.
सर्वेक्षणात सामील निम्म्या हिंदू पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलांनी शाळांमध्ये हिंदुद्वेषाचा अनुभव घेतला आहे, तर सर्वेक्षण केलेल्या 1 टक्क्यांहून कमी शाळांनी गेल्या पाच वर्षांत हिंदूविरोधी कोणत्याही घटनांची नोंद केली आहे. देशभरातील 988 हिंदू पालक आणि 1,000 हून अधिक शाळांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणात असे आढळून आले की, हिंदूंबद्दल अपमानास्पद संदर्भांची अनेक उदाहरणे आहेत, जसे की त्यांच्या शाकाहाराची थट्टा करणे आणि त्यांच्या देवतांचा अपमान करणे. इस्लामिक अतिरेक्यांनी लेस्टरमध्ये हिंदू समुदायाविरुद्ध रॅली देखील काढल्या होत्या.
एका प्रसंगात, एका हिंदू विद्यार्थिनीवर गोमांस फेकले होते. यासह एका विद्यार्थ्याला हिंदूविरोधी गुंडगिरीमुळे पूर्व लंडन येथे तीन वेळा शाळा बदलाव्या लागल्या होत्या. हिंदू विद्यार्थ्यांवरील आठ शारीरिक हल्ल्यांचे तपशील समोर आले होते. एका प्रसंगात एका मुलाला त्रास दिला गेला आणि सांगितले गेले की जर त्याने इस्लाम स्वीकारला तर त्याचे जीवन सोपे होईल. दुसऱ्या मुलाला सांगितले गेले की, 'तू फार काळ जगणार नाहीस... तुला स्वर्गात जायचे असेल तर इस्लाम स्वीकारावा लागेल. हिंदू अन्नसाखळीच्या तळाशी शाकाहारी प्राणी आहेत, आम्ही तुम्हाला खाऊन टाकू.' दुसर्या एका पालकाने सांगितले की, त्यांच्या मुलांना इस्लामिक धर्मोपदेशकाचे व्हिडिओ पाहण्यास आणि हिंदू धर्माला काही अर्थ नसल्यामुळे धर्मांतर करण्यास सांगितले होते. (हेही वाचा: India's Largest Trading Partner: 2022-23 मध्ये अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; चीन दुसऱ्या क्रमांकावर; 'या' देशांचा टॉप 5 मध्ये समावेश)
सर्वेक्षणात केवळ 15 टक्के पालकांचा असा विश्वास आहे की शाळा हिंदूविरोधी घटनांना पुरेसे स्वीकारून त्यावर कारवाई करतात. मिल्टन केन्सचे कंझर्व्हेटिव्ह खासदार बेन एव्हरिट यांनी द टेलीग्राफला सांगितले की, अहवालातील निष्कर्ष निंदनीय तसेच ‘धोकादायक’ आहेत आणि त्यांनी धार्मिक शिक्षणात तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन केले.