Montgomery Airport Alabama: विमानाच्या इंजिनमध्ये अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

जेट विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना अलाबामा येथील मॉन्टगोमेरी प्रादेशिक विमानतळावर ( Montgomery Regional Airport, Alabama) घडली. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 31 डिसेंबर रोजी घडली.

Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जेट विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना अलाबामा येथील मॉन्टगोमेरी प्रादेशिक विमानतळावर ( Montgomery Regional Airport, Alabama) घडली. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 31 डिसेंबर रोजी घडली. काही कामासाठी हा कर्मचारी दुपारी 3 वाजता एम्ब्रेर 170 च्या (Embraer 170's Engine) इंजिनमध्ये घुसला. मात्र, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बराच काळ तो बाहेर परतला नाही. त्यामुळे शोध घेतले असता त्याचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली, अशी माहिती अलाबामा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने दिलीआहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डॅलस येथून उड्डाण केल्यानंतर विमान उभे होते परंतु दुर्दैवाने त्याचे एक इंजिन चालू होते. दरम्यान, कर्मचाऱ्याने काही कामानिमित्त इंजिनमध्ये प्रवेश केला. मात्र, इंजिन सुरु असल्याने त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या एका प्रत्यक्षदर्शी सहकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Helicopters Collide In Mid-Air: दोन हेलिकॉप्टरची आकाशात समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू (Watch Video))

विमानतळाचे कार्यकारी संचालक, वेड डेव्हिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “एए/पीडमॉंट एअरलाइन्सच्या टीम सदस्याच्या दुःखद निधनाबद्दल आम्हाला दुःख झाले आहे. या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर अत्यंत अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या त्याच्या कुटुंबीयाप्रती आमच्या सद्भावना आहेत, असेही डेव्हीस यांनी म्हटले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement