Money Laundering and Human Smuggling in UK: यूके मध्ये आर्थिक घोटाळा आणि मानवी तस्करी मध्ये 12 भारतीय वंशाचे स्त्री, पुरूष दोषी

NCA च्या तपास अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, "व्यावसायिक स्तरावर मनी लाँड्रिंग आणि इमिग्रेशन गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या संघटित गुन्हेगारी गटाचा हा सविस्तर तपास करण्यात आला आहे

Crime | (File image)

लंडन (London) मध्ये ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने (National Crime Agency), आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) आणि मानवी तस्करीमध्ये (Human Smuggling)  पश्चिम लंडनस्थित क्राईम ग्रुपच्या चौकशीनंतर 16 जणांना दोषी ठरवलं आहे. या मध्ये भारतीय वंशाच्या काही महिला-पुरूषांचा देखील समावेश आहे. या सदस्यांनी 2017 आणि 2019 दरम्यान दुबई आणि UAE मध्ये सहली केल्या आणि यूकेमधून £42 दशलक्षपेक्षा जास्त रोख तस्करी केली असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीएच्या तपासानुसार, हा पैसा क्लास ए ड्रग्जच्या विक्रीतून आणि स्थलांतरित गुन्हेगारीतून कमावला होता.

NCA च्या तपास अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, "व्यावसायिक स्तरावर मनी लाँड्रिंग आणि इमिग्रेशन गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या संघटित गुन्हेगारी गटाचा हा सविस्तर तपास करण्यात आला आहे. NCA तपास अधिकार्‍यांनी 2 वर्ष पुरावे गोळा केले आहेत. यासाठी यूके आणि परदेशातील पार्टनरची देखील मदत घेतली आहे. Muslim Tell Hindu Classmates To Convert: ब्रिटनमधील हिंदू मुलांवर मुस्लिम वर्गमित्रांचा धर्मांतरासाठी दबाव; अन्यथा दिल्या जात आहेत नरकाच्या धोक्यांचा सामना करण्याच्या धमक्या .

यूके सोडणाऱ्या कुरिअर्सकडून सुमारे GBP 1.5 दशलक्ष जप्त करण्यात आले होते परंतु flight analysis, दुबईतील कॅश डिक्लरेशनचे पुरावे आणि NCA ने जप्त केलेले इतर साहित्य असे दर्शवते की त्यांच्याकडून अधिक वाहतूक करण्यात आली आहे.

पश्चिम लंडनमध्ये पहाटेच्या छाप्यांमध्ये अटक करण्यात आलेल्यांपैकी Hounslow येथील 44 वर्षीय गँगचा प्रमुख चरण सिंग हा देखील होता. सिंग यांच्यासह वालजीत सिंग, जसबीर सिंग कपूर, जसबीर सिंग ढल यांना गुन्हेगारी संपत्ती किंवा मनी लाँड्रिंग काढून टाकण्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

सर्व 16 दोषींना 11 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात येणार आहे, ज्यात दोन चाचण्यांपूर्वी मनी लाँड्रिंग गुन्ह्यांसाठी दोषी याचिका दाखल केलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now