Mob Lynching in Pakistan: पवित्र कुरणची कथीत विटंबना, पाकिस्तानमध्ये जमावाकडून एकाची हत्या

पीडित व्याक्ती पंजाब प्रांतातील सियालकोट जिल्ह्यातील असल्याचे समजते. या परिसरात पवित्र कुराणची (Quran) विटंबना झाल्याची चर्चा होती. ही विटंबना याच व्यक्तीने केल्याचा स्थानिकांना संशय होता.

Mob Lynching | (Photo credit: archived, edited, representative image)

पाकिस्तानच्या वायव्येस असलेल्या खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) येथील स्वात जिल्ह्यात जमावाने एकाची हत्या (Pakistan Mob Lynching) केली आहे. पीडित व्याक्ती पंजाब प्रांतातील सियालकोट जिल्ह्यातील असल्याचे समजते. या परिसरात पवित्र कुराणची (Quran) विटंबना झाल्याची चर्चा होती. ही विटंबना याच व्यक्तीने केल्याचा स्थानिकांना संशय होता. त्यातून प्रक्षुब्ध जमावाने एकत्र येत हे कृत्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आठ जण जखमी झाले. या घटनेबाबत माहिती देताना, जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) जाहिदुल्ला यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री स्वातच्या मद्यान तहसीलमध्ये या व्यक्तीने पवित्र कुराणची पाने जाळली. घटनेनंतर त्याला ताब्यात घेऊन मद्य पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, संशयिताला ताब्यात देण्याची मागणी करत काही वेळातच संतप्त जमाव स्टेशनबाहेर जमा झाला. या जमावाने या व्यक्तीची हत्या केली.

आरोपीला ताब्यात द्या, जमावाची पोलिसांकडे मागणी

पाकिस्तान पोलिसांनी माहिती देताना पुढे म्हले की, आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी जमावाने केली. मात्र, पोलिसांनी त्याला नकार दिला. त्यावर संतप्त झालेल्या जमावाकडून गोळीबार झाला. त्याला पाकिस्तानी पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी झालेल्या चकमकीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला मद्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती, डीपीओ झाहिदुल्ला यांनी दिली.  (हेही वाचा, Mob Lynches In Pakistan: इम्रान खान यांच्या पक्षाच्या रॅलीदरम्यान 'निंदा', पाकिस्तानमध्ये एकाचे 'मॉब लिंचींग')

जमावाकडून पोलीस स्टेशनला आग

जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता की, त्याने पोलीस स्टेशनलाच आग लावली. त्यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली. याच वेळी जमावातील काही लोक पोलीस स्टेशनमध्ये घुसले आणि त्यांनी संशयित आरोपीला मारहाण केली, त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. त्यानंतर जमावाने त्याचा मृतदेह मद्या अड्डा येथे नेला आणि तेथे त्याचा मृतदेह लटकविण्यात आल्याचेही पोलीस म्हणाले. या गोंधळात आठ जण जखमी झाले. घडल्या प्रकारानंतर परिसरात अद्यापही तणाव आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मद्यानमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हेही वाचा, Earthquake in Pakistan: पाकिस्तानची राजधानी भूकंपाच्या धक्क्याने हादरली; इस्लामाबादमध्ये 4.7 तीव्रतेचा भूकंप)

मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या घटनेची दखल घेत प्रांतीय पोलीस प्रमुखांकडून अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस महानिरीक्षकांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आणि जनतेला शांत आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणा असली तरी समाजामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनीही कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी आवश्यक तेथे सुरक्षा वाढविली आहे. दरम्यान, कथित संशियाने खरोखरच कुराणची विटंबना करण्याचे कृत्य केले होते का, याबाबत अधिक तपास सुरु आहे.