Coronation Ceremony of King Charles III पूर्वी Buckingham Palace परिसरात संदिग्ध व्यक्तीला अटक; काही शस्त्र, काडतूसं आढळली
पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तू सध्या खास टीम कडे पाठवण्यात आल्या आहेत. संशयास्पद पिशवीसह व्यक्ती सापडल्यानंतर पॅलेसच्या परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.
लंडनच्या (London) राजघराण्यामध्ये आता राणी एलिझाबेझ || (Elizabeth II) च्या निधनानंतर राजगादीची सूत्र किंग्स चार्ल्स ||| (King Charles III ) कडे दिल्यानंतर 6 मे दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. त्याची जय्य्यत तयारी सुरू असतानाच आता Buckingham Palace जवळ एक संदिग्ध व्यक्ती पकडण्यात आला आहे. या भागात काही काडतुसं सापडल्याने खळबळ पसरली आहे. मंगळवारी ही काडतुसं आढळल्याची माहिती Metropolitan Police कडून देण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडे काही संशयास्पद शस्त्र, सुरा देखील सापडला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तू सध्या खास टीम कडे पाठवण्यात आल्या आहेत. संशयास्पद पिशवीसह व्यक्ती सापडल्यानंतर पॅलेसच्या परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. नक्की वाचा: Coronation Ceremony of King Charles III: भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लावणार उपस्थिती .
पहा ट्वीट
पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिस कोठडीत टाकले. या प्रकरणामध्ये कोणतेही शॉर्ट फायर झाल्याची घटना समोर आलेली नाही. तसेच पोलिसांसोबतच कोणावरही शॉर्ट फायर झाल्याची माहिती समोर आलेली नाही. असे Chief Superintendent Joseph McDonald यांनी म्हटलं आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेचा कोणत्याही दहशतवादाशी निगडीत प्रकाराशी संबंध नाही. असे देखील पोलिसांनी जाहीर केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)