Road Accident In Bangladesh: बांगलादेशात मोठा अपघात; प्रवासी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली, 8 महिलांसह 17 जणांचा मृत्यू

एका पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, गोताखोरांनी 17 मृतदेह बाहेर काढले. क्रेनच्या साहाय्याने मुसळधार पावसानंतर पाण्याने भरलेल्या तलावातून बस उचलण्याचा प्रयत्न करत होते.

Accident (PC - File Photo)

Road Accident In Bangladesh: दक्षिण-पश्चिम बांगलादेशात (Bangladesh) शनिवारी एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या तलावात पडली. या अपघातात (Accident) 17 जणांना जीव गमवावा लागला. तसेच या घटनेत डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झलकाठी जिल्ह्यात 60 हून अधिक प्रवाशांना घेऊन ही बस भंडारिया उपजिल्ह्यातून दक्षिण-पश्चिम विभागीय मुख्यालय बारिशालकडे जात असताना हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस तलावात पडली.

एका पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, गोताखोरांनी 17 मृतदेह बाहेर काढले. क्रेनच्या साहाय्याने मुसळधार पावसानंतर पाण्याने भरलेल्या तलावातून बस उचलण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस उपनिरीक्षक गौतम कुमार घोष यांनी सांगितले की, मृतांमध्ये आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. (हेही वाचा - Husband Murdered His Wife in Gwalior: पत्नीने परफ्युम लावल्याने संतापलेल्या पतीने मारली पत्नीला गोळी; आरोपीवर गुन्हा दाखल)

बसमध्ये आणखी काही मृतदेह अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इतर वीस प्रवाशांवर ढालकठी येथील मुख्य शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये 65 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात जखमी झालेला प्रवासी रसेल मोल्ला यांनी सांगितलं की, मी ड्रायव्हरच्या सीटजवळ बसलो होतो. चालकाने बस चालवताना काळजी घेतली नाही. ड्रायव्हर त्याच्या सहाय्यकाशी सतत बोलत होता आणि त्याला अधिक प्रवासी बसवण्यास सांगत होता. या अपघातात मोल्लाने त्याचे वडील (वय 75 वर्षे) गमावले, तर त्याचा मोठा भाऊ अद्याप बेपत्ता आहे.

दरम्यान, बस तलावात पडल्याने आम्ही ज्या रुग्णांवर उपचार करत आहोत त्यांच्या पोटात जास्त पाणी असल्याचं आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement