अबु धाबी मध्ये पार पडला पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा; गुरू महंत स्वामी महाराज सह स्थानिक नेत्यांचा सहभाग (Watch Video)
या कार्यक्रमामध्ये अनेक स्थानिक भारतीयांनीदेखील उपस्थिती लावली होती.
Swami Narayan Temple at Abu Dhabi: UAE ची राजधानी अबु धाबी (Abu Dhabi) येथे आज पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. अबु धाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर हे स्वामीनारायण मंदिर ( Swami Narayan Temple) आहे. या मंदिराचे धार्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळेस युएईचे स्थानिक नेते मंडळी आणि हिंदू महंत यांनी एकत्रितपणे वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात पायाभरणी केली. या कार्यक्रमामध्ये अनेक स्थानिक भारतीयांनीदेखील उपस्थिती लावली होती.
स्वामीनारायण मंदिराच्या पायाभरणीचा व्हिडिओ
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दौर्यात या मंदिराबद्दल माहिती दिली होती. अबु धाबीचे क्राऊन प्रिंस शेख मोहम्मद बिन जाएद अल नहयनने हिंदू मंदिराच्या निर्माणासाठी 13.5 एकर जमीन दिली होती. त्यानंतर युएई सरकारने इतकीच जमिन मंदिर परिसरात पर्किंग साठी दिली आहे.