World's Best Cities 2025: जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये लंडन अव्वल; टॉप 100 मध्ये कोणत्याही भारतीय शहराचा समावेश नाही

दुसऱ्या क्रमांकारवर न्यूयॉर्क आणि पॅरिसचा क्रमांक लागतो. या यादीत पहिल्या 100 च्या यादीत एकाही भारतीय शहरांचा समावेश नाही.

London (फोटो सौजन्य - Wikipedia)

World's Best Cities 2025: जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत पुन्हा एकदा लंडन शहराने (London City) अव्वल स्थान मिळवले आहे. लंडनने जागतिक सर्वोत्तम शहरे 2025 (World's Best Cities 2025) मध्ये सलग दहाव्या वर्षी बुधवारी जाहीर केलेल्या निश्चित रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकारवर न्यूयॉर्क आणि पॅरिसचा क्रमांक लागतो. या यादीत पहिल्या 100 च्या यादीत एकाही भारतीय शहरांचा समावेश नाही. इप्सॉसच्या भागीदारीत रेझोनन्स कन्सल्टन्सीने तयार केलेली वार्षिक रँकिंग हे जगभरातील मोठ्या शहरी क्षेत्रांचे विश्लेषण आहे जे कर्मचारी, अभ्यागत आणि व्यवसायांना आकर्षित करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या पैलूंमध्ये आघाडीवर आहेत.

जागतिक सर्वोत्तम शहरांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये भारतातील शहरांचा समावेश नाही -

2025 च्या अहवालात प्रथमच 31 देशांमधील 22,000 हून अधिक लोकांचे सर्वेक्षण करून धारणा-आधारित डेटाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत मुंबई आणि दिल्ली अव्वल 100 च्या बाहेर आहेत. आशिया पॅसिफिक संदर्भातील ती शहरे अव्वल आहेत. परंतु, जागतिक स्तरावर ती टॉप 100 मध्ये येत नाहीत, असं रेझोनान्स कन्सल्टन्सीचे अध्यक्ष आणि सीईओ ख्रिस फेअर यांनी पीटीआयला सांगितले. (हेही वाचा - Mumbai City Is Asia's Billionaire Capital: आशियातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात मुंबईत, पाहा जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या टॉप-10 शहरांची यादी)

मुंबई आणि दिल्लीत काही विशिष्ट सामर्थ्य आहेत, परंतु या इतर शहरांच्या तुलनेत राहण्यायोग्यतेच्या दृष्टीकोनातून त्यांचा काही विशिष्ट कमकुवतपणा आहेत. परंतु फेब्रुवारीमध्ये आशिया-पॅसिफिक अहवालात ते पहिल्या 20 मध्ये आहेत, असंही ख्रिस फेअर यांनी नमूद केलं. जगातील सर्वोत्कृष्ट शहरांची रँकिंग लिव्हेबिलिटी किंवा शहराच्या नैसर्गिक आणि बांधलेल्या वातावरणाच्या गुणवत्तेवर आधारित भौतिक अर्थावर तयार केली जाते. (हेही वाचा -Top 10 Cities Famous for Education: शैक्षणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली भारतामधील टॉप 10 शहरे; यादीत पुणे व मुंबईचा समावेश (See Full List))

दरम्यान, लंडन अँड पार्टनर्सच्या सीईओ, यूके कॅपिटलची ग्रोथ एजन्सी लॉरा सिट्रॉनने सांगितले की, आमची प्रतिष्ठित आकर्षणे, जागतिक दर्जाचे आर्थिक क्षेत्र आणि झपाट्याने वाढणारा तंत्रज्ञान उद्योग हे आमच्या शहराच्या सामर्थ्याचे पुरावे आहेत. परंतु आमच्या लोकांची विविधता आणि कल्पना हे नावीन्य, संधी आणि प्रगती घडवून आणतात जे आमचे भविष्य घडवतात.

जागतिक सर्वोत्तम शहरांच्या यादीत टॉप 10 शहरे -

लंडन (यूके), न्यूयॉर्क (यूएस), पॅरिस (फ्रान्स), टोकियो (जपान), सिंगापूर, रोम (इटली), माद्रिद (स्पेन), बार्सिलोना (स्पेन), बर्लिन (जर्मनी) आणि सिडनी (ऑस्ट्रेलिया) या शहरांचा जागतिक सर्वोत्तम शहरांच्या यादीत पहिला 10 मध्ये समावेश आहे. युनायटेड स्टेट्स शीर्ष 100 मध्ये 36 शहरांसह आघाडीवर आहे, तर कॅनडा सहा शहरांसह दुस-या क्रमांकावर आहे. 2025 च्या क्रमवारीत केपटाऊन आणि रिओ डी जनेरियोने ठसा उमठवला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now