अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 च्या शर्यतीत उतरणाऱ्या पहिल्या हिंदू उमेदवार Tulsi Gabbard यांच्याबद्दल काही खास गोष्टी!

कॅथलिक परिवारात जन्मलेल्या तुलसी हिंदू आहेत पण भारतीय नाहीत.

Tulsi Gabbard (Photo Credit: Getty Images)

अमेरिकन संसदेत लवकरच एक हिंदू महिला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार आहे. 2020 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत डेमोक्रेटीक पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard) या दुसऱ्या महिला उमेदवार आहेत. 2020 च्या निवडणूकीत ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी 12 पेक्षा अधिक डेमोक्रेटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. मात्र भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड या अमेरिकन नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी...

तुलसी हिंदू आहेत पण भारतीय नाहीत....

# तुलसी या हिंदू आहेत पण भारतीय नाहीत. तुलसी गबार्ड यांचा जन्म 12 एप्रिल 1981 मध्ये अमेरिकेतील समोआ येथील लिओलालोआ (Leloaloa) येथे एका कॅथलिक परिवारात झाला. माईक गबार्ड आणि कॅरल पोर्टर हे त्यांचे आई-वडील होते.

# त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स इन बिजनेस अॅडमिनची पदवी हवाई पॅसिफिक युनिव्हसिटीतून (Hawaiʻi Pacific University) संपादन केली आहे. त्यांच्या आई कॉकेशियन caucasian असून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.

# गीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन राजकारणी ठरल्या. त्या भारतीय नसल्या तरी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अमेरिकत भारतीय-अमेरिकन संप्रदाय अतिशय प्रभावशाली मानला जातो.

# तुलसी गबार्ड 2013 पासून अमेरिकेतील हवाई राज्यातून हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्समध्ये डेमोक्रेट सदस्य आहेत.

# 37 वर्षांच्या तुलसी हवाई राज्यातून चार वेळा जिंकून आल्या असून प्रत्येक वेळेला विक्रमी मतांनी त्या यशस्वी झाल्या आहेत.

# राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या सैन्यात होत्या. सैन्याकडून त्या 12 महिने इराकमध्ये तैनात होत्या.

# भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक असलेल्या तुलसी यांनी अनेकदा मोदींचे खुलेपणाने भरभरुन कौतुक केले आहे.

# मोदींच्या कौतुक करताना त्या म्हणाल्या होत्या की, "कोणत्याही मुद्याचा मोदी खोलवर विचार करतात. आपल्या समर्पणाने मोदींनी जनतेसमोर मोठे उदाहरण सादर केले आहे."

तुलसी यांच्या बद्दल खास माहिती...

तुलसी या पूर्णपणे शाहकारी आहेत. त्या चैतन्य महाप्रभूंच्या आध्यात्मिक वैष्णव संप्रदायाचे अनुकरण करतात. भक्ती, जय, नारायण आणि वृंदावन अशी त्यांच्या भावा-बहिणींची हिंदू नावे आहेत. भगवतगीतेला आध्यात्मिक मार्गदर्शक मानणाऱ्या तुलसी कर्मयोगावर विश्वास ठेवतात.

तुलसी यांनी 2002 मध्ये एडवर्डो तामायो यांच्यासोबत विवाह केला होता. मात्र 2006 मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये अब्राह्म व्हिलयमसोबत वैदिक पद्धतीने विवाह केला.