Landslide in Ecuador: इक्वेडोरमधील बनोस शहरात भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी; 6 ठार, 30 बेपत्ता
भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण बेपत्ता झाले आहेत.
Landslide in Ecuador: इक्वेडोरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मोठी हानी झाली आहे. तेथे भूस्खलन(Landslide) होऊन सहा जणांचा मृत्यू होऊन 30 जण बेपत्ता झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती इक्वेडोर(Ecuador)च्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. इक्वाडोरच्या आपत्ती व्यवस्थापन सचिवालयाने एका अहवालात म्हटले आहे की, देशाच्या मध्यभागी बनोस डे अगुआ सांता शहरात भूस्खलन झाले. इक्वाडोरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रॉबर्टो लुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावना व्यक्त करत प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
रविवारी मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये कमी दाबामुळे वादळी पावसाने हजेरी लावली. विविध देशांत भूस्खलन, पूराच्या घटना घडल्या. एल साल्वाडोरमध्ये, देशाच्या नागरी संरक्षण एजन्सीने लहान राष्ट्रात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट घोषित केला. तर शेजारच्या ग्वाटेमालामध्ये अनेक एअरलाइन्सने विमानांची उड्डाणे थांबवली.