Jeff Bezos: जेफ बेजोस सोडणार Amazon कंपनीचे CEO पद; एंडी जेसी यांच्याकडे जाणार सूत्रे
बोजोस यांची जागा क्लाउड कंप्यूटिंग बिजनेसचे नेतृत्व करणारे एंडी जेसी (Andy Jassy) करतील. जवळपास 30 वर्षे सीईओ पदावर राहिल्यानंतर बेजोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवी भूमिका निभावणार आहेत.
ऑनलाईन सेवा पूरवणाऱ्या ई-कॉमर्स कंपनी (E-Commerce Company ) अॅमेझॉनचे सीईओ (CEO Of Amazon) जेफ बेजोस (Jeff Bezos) आपल्या पदावरुन पायऊतार होत आहेत. एका साधी ऑनलाईन बुकसेलर ते जगातील सर्वात शक्तिमान ई-कॉमर्स कंपनी असा अॅमेझॉन कंपनीचा प्रवास करणारे आणि या प्रवासाचा प्रमुख साक्षीदार असलले जेफ बेजोस आपल्या पदाचा राजीनामा देणार म्हटल्यावर चर्च तर होणारच. जेफ बेजोस यांच्यानंतर एंडी जेसी (Andy Jassy) हे अॅमेझॉन कंपनीचे नवे सीईओ असणार आहेत. दरम्यान, जेफ बोझेस यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते अॅमेझॉन कंपनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. जेफ बेजोस हे आपल्या नव्या करीअरची सुरुवात करणार आहेत. त्यासाठी ते अधिक वेळ देऊ इच्छितात.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेफ बोजोस हे उद्या (सोमवार, 5 जुलै) पासून अॅमेझॉन कंपनीचे सीईओ असणार नाहीत. बोजोस यांची जागा क्लाउड कंप्यूटिंग बिजनेसचे नेतृत्व करणारे एंडी जेसी (Andy Jassy) करतील. जवळपास 30 वर्षे सीईओ पदावर राहिल्यानंतर बेजोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवी भूमिका निभावणार आहेत. बेजोस यांनी फेब्रवारीच्या सुरुवातीलाच म्हटले होते की, ते आता इतर काही कामांना प्राधान्य देणार आहेत. तसेच, आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर अधिक लक्ष्य केंद्रीत करतील. त्यासाठी ते अॅमेझॉन कंपनीचे सीईओपद सोडू इच्छितात.
जेफ बोजोस यांनी आपल्या करीअरची सुरुवात एका गॅरेजपासून केली होती. त्यांनी स्वत: ऑर्डर पॅक केल्या आणि पोस्ट ऑफिसमध्ये बॉक्सही पाठवले. त्यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळवत गेलेली अॅमेझॉन आंतरराष्ट्रीय बाजारात तबबल 1.7 ट्रिलियन डॉलर पेक्षाही अधिक मूल्य असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. अॅमेझॉन आज ई-कॉमर्स, क्लाउड कंप्यूटिंग, ग्रॉसरी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, स्ट्रीमिंग मीडिया आणि इतरही क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने 2002 पासून 386 बिलियन डॉलर्स इतके वार्षीक गुंतवणूक आणि उलाढाल, नफ्यासह केली आहे.