युसाकू माइजावा या जपानी अब्जाधीशाने ट्विटर फॉलोअर्सना फुकटात वाटले 64 कोटी रुपये

त्यासाठी इंटरनेट सर्वेच्या माध्यमातून ते या लोकांवर लक्ष ठेवणार आहेत. आपल्या युट्युब चॅनलवर माइजावा यांनी हा एक गंभीर सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. या प्रयोगात अर्थतज्ज्ञांनाही विशेष रुची असल्याचा दावा माइजावा यांनी केला आहे.

Yusaku Maezawa | (Photo Credits: Twitter )

जपानमधील एका अब्जाधीश (Japanese Billionaire) उद्योजकाने आपल्या ट्विटर फॉलोअर्सना चक्क 90 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत चक्क 64 कोटी रुपये वाटले आहेत. तेसुद्धा फुकटात. वाटले ना आश्चर्य? होय! खरोखरच असे घडले आहे. युसाकू माइजावा (Yusaku Maezawa) असे या उद्योगपतीचे नाव आहे. तो एका फॅशन कंपनीचा मालक आहे. केवळ लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठी त्यांनी इतक्या पैशांचे वाटप केले. माइजावा यांचे ट्विटरवर 64 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र त्यातील केवळ 1,000 फॉलोअर्सची निवड करणार आहेत. एक जानेवारी या दिवशी त्यांनी ट्विट केले होते. हे ट्विट ज्या लोकांनी रिट्विट केले त्यातील 1 हजार लोकांना ही रक्कम मिळणार आहे.

आपण दिलेल्या एक हजार रुपयांचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो हे पाहण्यात माइजावा यांना अधिक रुची आहे. त्यासाठी इंटरनेट सर्वेच्या माध्यमातून ते या लोकांवर लक्ष ठेवणार आहेत. आपल्या युट्युब चॅनलवर माइजावा यांनी हा एक गंभीर सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. या प्रयोगात अर्थतज्ज्ञांनाही विशेष रुची असल्याचा दावा माइजावा यांनी केला आहे.

युसाकू माइजावा हे केवळ उद्योजकच नाहीत तर, ते एलन मस्क च्या स्पेसएक्स विमानात बसून चंद्राची सफर करणारे जगातील पहिले खासगी आंतराळवीरही आहेत. जगभरातील अनेक कलाकृती आणि स्पोर्ट्स कारवरती मोठ्या प्रमाणावर खर्च करणारी व्यक्ती अशीही त्यांची ओळख आहे. तसेच, ते जपान देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग मॉल जोजोटाउन चे संस्थापकही आहेत. (हेही वाचा, List of Richest Person: Jeff Bezos ते मुकेश अंबानी; 2020 च्या पहिल्या दिवशी जाणून घ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, किती आहे त्यांची संपत्ती)

युसाकू माइजावा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात खास करुन ते युट्युबवर सातत्याने आपले विचार मांडत असतात. हे विचार मांडत असताना समाजातील विविध घटना घडामोडी आदींवर ते भाष्य करतात. 43 वर्षीय माइजावा हो अभिनेत्री असलेली आपल्या गर्लफ्रेंडपासून वेगळे झाल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. गर्लफ्रेंडशी असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांनी जाहीरपणे त्यावर भाष्य केले होते. त्यानंतर ट्विटरवरील त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. त्यांची खासगी संपत्ती सुमारे 2 अब्ज डॉलर इतकी आहे. ते जपान देशातील 22 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif