Japan Plane Fire Inside Video: विमानाला आग लागल्याने टोकियो येथील हनेडा विमानतळावर आणीबाणी, व्हिडिओ व्हारल
जपान एअरलाइन्सच्या JAL 516 या विमानास लँडिंग करताना टोकियोच्या हानेडा विमानतळावर (Haneda Airport) मंगळवारी आग (apan Airlines Flight Catches Fire) लागली. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
जपान एअरलाइन्सच्या JAL 516 या विमानास लँडिंग करताना टोकियोच्या हानेडा विमानतळावर (Haneda Airport) मंगळवारी आग (apan Airlines Flight Catches Fire) लागली. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विमानाला लागलेली आग आणि खिडकीतून आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, विमानातील सर्व 379 प्रवासी आणि क्रू सदस्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे. एक विमान दुसऱ्या विमानावर आदळून ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. विमानतळ प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.
विमानाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जपान एअरलाइन्सच्या संपूर्ण विमान खाली करुन प्रवासी आणि क्रूमेंबर्सच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. घटना घडली तेव्हा विमानात 379 प्रवासी, पायलट आणि क्रू मेंबर्स होते. NHK ने कॅप्चर केलेल्या फुटेजमध्ये आगीची घटना अधिक विस्तृतपणे पाहायला मिळते. ज्यामुळे घटनेच्या संभाव्य परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Tokyo Plane On Fire Video: टोकियो मध्ये Haneda Airport वर धावपट्टीवर विमानाला लागली भीषण आग (Watch Video))
मदत आणि बचाव कार्य सुरु
जपानी प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, विमान हानेडा विमानतळावर उतरल्यानंतर दुसऱ्या विमानाशी टक्कर झाल्याने ही घटना घडली असावी, अशी शक्यता आहे. आग नियंत्रण आणि मदत व बचाव कार्यास प्रथम प्राधान्य आहे. त्यानंतर दुर्घटनेचे कारण शोधण्यात येईल.
दोन विमाने धडकल्याने दुर्घटना घडल्याची शक्यता
अधिक माहिती अशी की, होक्काइडो येथून निघालेल्या या फ्लाइटला टोकियोमध्ये उतरल्यावर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यानंतरच्या व्हिडिओ फुटेजमध्ये अग्निशमन दल सक्रियपणे आग आटोक्यात आणताना दिसते. घटनेचा एकूण तपशील विस्ताराने अद्यापही पुढे आला नाही. मात्र, या दुर्घटेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी नाही. घटना विमानतळावरच घडल्याने अग्निशमन दलाला तातडीने कार्यवाही करता आली. जेणेकरुन संभाव्य धोका टळला.
व्हिडिओ
दरम्यान, या आधीही अनेक विमानतळांवर आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता ही घटना पुढे आल्याने विमानतळांवरील विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरही अधोरेखीत झाला आहे. संभाव्य घटना, दुर्घटना टाळण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडून वारंवार प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही कधी मानवी चुका तर कधी तंत्रज्ञानात झालेली गफलत यांमुळेही अपघातांना निमंत्रण मिळते. असा घटनांमुळे कधी कधी प्रवाशांना आणि विमानातील क्रू मेंबर्सनाही प्राण गमवावे लागतात. या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)