लॉकडाऊनमुळे गुरुग्राम ते दरभंगा हा 1200 किमी चा प्रवास जखमी वडिलांना घेऊन सायकलवरुन करणाऱ्या ज्योती कुमारी हिचे इंवाका ट्रम्प कडून कौतुक! (View Tweet)
ज्योती कुमारी या 15 वर्षांच्या मुलीने देखील आपल्या जखमी वडीलांना घेऊन तब्बल 1200 किमी चा प्रवास सायकलने केला आहे. तिच्या या संघर्षमय प्रवासाचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिने केले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक स्थलांतरीत मजूर स्वगृही परतण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहे. ज्योती कुमारी (Jyoti Kumari) या 15 वर्षांच्या मुलीने देखील आपल्या जखमी वडीलांना घेऊन तब्बल 1200 किमी चा प्रवास सायकलने केला. तिच्या या संघर्षमय प्रवासाचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची मुलगी इवांका ट्रम्प (Ivanka Trump) हिने केले आहे. गुरुग्राम (Gurugram) येथून बिहार (Bihar) मधील दरभंगा (Darbhanga) येथील आपल्या घरी परतण्यासाठी ज्योतीने सायकलचा आधार घेतला. ज्योती कुमारी हिच्या या संघर्ष, जिद्द आणि धैर्याबद्दल कौतुक करण्यासाठी इंवाका ट्रम्प हिने खास पोस्ट केली आहे.
ज्योतीची बातमी शेअर करत इंवाकाने ट्विटमध्ये लिहिले, "15 वर्षांच्या ज्योती कुमारीने आपल्या जखमी वडिलांना घेऊन स्वगृही परतण्यासाठी तब्बल 12000 किमीचा प्रवास सायकलवरुन केला. त्यासाठी तिने 7 दिवस सायकल चालवली. हे सुंदर पाय सहनशक्तीचे उदाहरण आहेत. यामुळे भारतीय लोकांची कल्पनाशक्तीने आणि सायकल फेडरेशनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे."
Ivanka Trump Tweet:
इवांकाच्या या ट्विटवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी उत्तर दिले आहे. सरकार ज्योतीला चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी देत आहे. तिची गरिबी आणि लाचारी या गोष्टी समोर आणून तिने 1200 किमी चा प्रवास एखाद्या थ्रिलसाठी केला असे प्रदर्शित केले जात आहे.
ज्योती आणि तिचे वडील हरियाणा येथील गुरुग्राम येथे राहतात. लॉकडाऊन काळात झालेल्या अपघातात तिचे वडील मोहन पासवान जखमी झाले आहेत. त्यामुळे ते घरी जावू शकत नव्हते. म्हणून 10 मे रोजी ज्योती आपल्या वडीलांना घेऊन गुरुग्रामवरुन सायकल चालवत निघाली. 16 मे रोजी ती बिहार येथील दरभंगा येथे पोहचली.
ज्योतीची परिस्थिती आणि तिचे धैर्य पाहुन अनेकजण भारावून गेले आहेत. इंवाका ट्रम्पही ज्योतीच्या धाडसामुळे प्रभावित झाली आणि तिने ज्योतीचे भरभरुन कौतुक केले.