Israel Hamas War : इस्त्रायलचा हमासवर रॉकेट हल्ला; ३५ पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा

यात ३५ पॅलेस्टिनी (Palestinians)ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य विभागाने त्याला दुजोरा दिला आहे.

Photo Credit -X

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये घमासान पहायला मिळत आहे. अनेक वेळा हे युद्ध थांबवण्याचा इतर देशांनी प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अयशस्वी ठरले. या युद्धात आतापर्यंत मोठी जिवीतहानी झाली. हजारोंच्या संख्येने नागरिक मारले गेले. आज सोमवारी पहाटे इस्त्रायलने हमासवर हवाई हल्ला (Israels Rocket Attack) केला. यात ३५ पॅलेस्टिनी (Palestinians)ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य विभागाने त्याला दुजोरा दिला आहे. शनिवारी हमासने इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आज इस्त्रायलने हमासवर हवाई हल्ला केला.

गाझा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रफाहमधील विस्थापित लोकांसाठी छावणी उभारण्यात आली होती. याच छावणीवर इस्त्रायने हवाई हल्ला केला. यात ३५ निष्पाप लोक मारले गेले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय इस्त्रायलने उत्तर गाझामधील जबलिया अल-नजलाह भागातील एका घरावरही हल्ला केल्याचं हमासने म्हटलं आहे. यात १२ लोक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मध्य इस्रायलमधील दक्षिण गाझामधील रफाह भागातून ८ रॉकेट डागले. दरम्यान, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत पॅलेस्टिनी प्राधिकरणाची गरज आहे, असं युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी म्हटलं आहे.