Israel-Hamas Conflict: इजराइल लष्कराने गाझा सीमेवर पाठवले 9,000 सैनिक, हमासवर 40 मिनीटात डागली 450 क्षेपणास्त्र
इजरायल आणि हमास यांच्यातील संघर्ष (Israel-Hamas Conflict) अधिक तीव्र होताना दिसत आहे. हा संघर्ष थांबावा यासाठी जगभरातील अनेक देश अवाहन करत आहेत. तरीही हा संघर्ष इतक्यात तरी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.
इजरायल आणि हमास यांच्यातील संघर्ष (Israel-Hamas Conflict) अधिक तीव्र होताना दिसत आहे. हा संघर्ष थांबावा यासाठी जगभरातील अनेक देश अवाहन करत आहेत. तरीही हा संघर्ष इतक्यात तरी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल (13 मे 2021) रात्री इजराइलने (Israel) हमास (Hamas ) वर जोरदार चढाई केली. इतकी की अवघ्या 40 मिनिटांमध्ये हमासवर सुमारे 450 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इसराइलने हमासच्या 150 ठिकाणांना लक्ष्य केले. ज्यामुळे हमासला मोठे नुकसान सहन करावे लागले. दुसऱ्या बाजूला इजराईल लष्कराने गाझा सीमेवर 9,000 सैनिकही पाठवले आहेत.
इसराइलने पाठवलेल्या 9000 सैनिकांना हमास (Hamas) शासीत क्षेत्रात जमीनीवरुन आक्रमण करण्यासाठी सज्ज राहण्याचेही आदेश दिल्याचे समजते. इसराईल आणि हमास यांच्यातील संघर्ष पाहून असे चित्र दिसत आहे की, दोन्ही देश युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जागतिक पातळीवरुन हा संघर्ष थांबविण्यासाठी जरी प्रयत्न होत असले तरी हा संघर्ष थांबण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. इस्त्राईलमध्ये धार्मिक हिंसा सलग चौथ्या रात्रीही झाल्यानंतर ही लढाई आणखी आक्रमक स्वरुप धारण करताना दिसत आहे. यहूदी आणि अरब समुहांनी लॉड शहरामध्ये मोठी धुमश्चक्री झाली. पोलिसांची कुमक अधिक वाढवण्याचे आदेश मिळाल्यानंतर ही धुमश्चक्री झाल्याचे समजते. या लढाईत इस्त्राईलने अनेक दशकांनंतर मोठ्या यहूदी-अरब हिंसेला जन्म दिल्याचे समजते. लेबनानमधून रात्री उशीरा रॉकेट लॉंचरने मारा करण्यात आला. ज्यात इसराईलच्या उत्र सीमेवर आता आणखी एक तिसरा पक्ष उतरल्याचा धोका निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Israel-Palestine Conflict: हमासचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 130 रॉकेट डागले; भारतीय महिला ठार)
इसराइलने डिफेन्स फोर्सने म्हटले आहे की, आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बॉम्बवर्षाव आहे. आम्ही आमच्या या हल्ल्यामुळे हमासच्या लष्करी तळांना मोठा धक्का पोहोचवला आहे. हमासने छेडलेल्या संघर्षात इसराईलने आतापर्यंत आयर्न डोम एरियल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रॉकेड लॉन्चरने मारा केला आहे. तसेच गाझा येथील इमारतीही मोठ्या प्रमाणावर उदद्वस्त केल्या आहेत.
इसरायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत गाजा पट्टीमध्ये 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात 31 बालकं आणि 19 महिलांचा समावेश आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये इसलाईलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हा मृत्यू झाला आहे. तर इसराईलच्या 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इसराईलच्याही काही शहरांमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणी यहूदी आणि अरब यांच्यात एकमेकांमध्ये हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)