Gaza Israel Conflict: गाझामध्ये शाळेवर इस्त्रायलचा मोठा हवाई हल्ला; 90 पॅलेस्टिनी ठार, शेकडो जखमी

पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेने दिलेल्या हवाल्यानुसार, पूर्व गाझामधील विस्थापित लोकांच्या शाळेच्या घरांना लक्ष्य करून इस्त्रायली हल्ल्यात 90 हून अधिक जण ठार झाले आहेत.या हल्ल्यात, अनेकजण जखमी झाले आहेत.

Photo Credit- X

Gaza Israel Conflict: गेल्या एक वर्षापासून गाझा (Gaza)आणि इस्त्रायल(Israel)मध्ये युद्ध सुरू आहे. आजमिळालेल्या माहितीनुसार, या शाळेत लोक प्रार्थना करत असताना हा हल्ला झाला. इस्रायली हल्ल्यांनी विस्थापित लोकांना पहाटे प्रार्थना करत असताना त्यांना लक्ष्य केले, यामुळे मृतांच्या संख्येत तीव्र वाढ झाली. गेल्या आठवड्यात इस्त्रायलने गाझामधील चार शाळांवर हल्ला केला होता. 1 ऑगस्ट रोजी दलाल अल-मुगराबी शाळेवर इस्रायली हल्ल्यात 15 जण ठार झाले होते. (हेही वाचा: Israel-Gaza Conflict: गाझा येथे शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 16 ठार, पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची माहिती)

4 ऑगस्ट रोजी, गाझा शहरातील विस्थापित लोकांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करणाऱ्या दोन शाळांवर इस्रायलने हल्ला केला होता. त्यात 30 लोक ठार आणि अनेक जखमी झाले होते. त्याशिवाय, गाझा शहरातील हमामा शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 17 जण ठार झाले होते. कंपाऊंडमध्ये दहशतवादी आहेत जे 'हमास कमांड कंट्रोल सेंटर म्हणून काम करत आहेत', असा दावा इस्रायलने केला. (हेही वाचा: Israel-Palestine Conflict: इस्रायलने हमासच्या लष्करी कमांडरला केले लक्ष्य; दक्षिण गाझामध्ये 90 ठार)

7 ऑक्टोबर 2023 रोजी, पॅलेस्टिनी गट हमासने गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलच्या गाझा भागात सशस्त्र घुसखोरी करून इस्रायलवर अचानक हल्ला केला. ही पॅलेस्टाईनची दशकांतील सर्वात मोठी चकमक मानली जात होती. या काळात सुमारे 1, 200 लोक ठार झाले आणि अनेकांना कैद करण्यात आले. इस्रायलने याला युद्धपातळीवर प्रत्युत्तर दिले आणि सध्याही संघर्ष सुरूच आहे. तेव्हापासून इस्रायल गाझामधील शाळांसह इमारतींवर सातत्याने हल्ले करत आहे. गाझामध्ये १० महिन्यांपासून चाललेल्या युद्धात 40 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.