Indonesia Volcano Eruption: सर्वाधिक मोठ्या सेमरु ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 13 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु
यामध्ये 13 जणांचा बळी गेला आहे. तर या प्रकरणी आता मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
Indonesia Volcano Eruption: इंडोनेशियातील जावा बेटावर सेमरु ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 13 जणांचा बळी गेला आहे. तर या प्रकरणी आता मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रवक्ते अब्दुल मुहरी यांनी असे म्हटले की, मृतांमधील 2 जणांची ओळख पटली आहे. त्याचसोबत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की, बहुतांश लोक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जळाले आहेत.
इंडोनेशियातील टोबेलो पासून 259 किमी दूर उत्तर दिशेला आज सकाळी भुकंपाचे तीव्र धक्के सुद्धा जाणवले. अमेरिकेतील जियोलॉजिकल सर्वेला मिळालेल्या माहितीनुसार, 6.0 रिश्टर स्केल ऐवढे भुकंपाचे धक्के जाणवले गेले. मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही.(Shocking! उडत्या विमानात चक्क मांजरीला 'स्तनपान' करू लागली महिला; प्रवाशांनी केली तक्रार, जाणून घ्या काय घडले पुढे...)
Tweet:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोक अशा क्षेत्रात अडकले आहेत तेथे अद्याप एनडीआरएफचे पथक पोहचलेले नाही. त्यामुळे ज्वालामुखीमधून बाहेर पडत असलेल्या धुराच्या लोटांमुळे नागरिकांना बाहेर काढणे मुश्किल होत आहे. सेमरु इंडोनेशियातील 130 सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. तो सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणीच आहे. हा वर्षातील दुसरा उद्रेक आहे. यापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक 1 जानेवारीला झाला होता. पण त्या वेळी कोणताही जीवितहानी झाली नव्हती.