IPL Auction 2025 Live

कौतुकास्पद ! ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाने शोधली कोरोना व्हायरसवरील लस; प्राथमिक चाचणी यशस्वी

अद्याप या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र, ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाने कोरोना व्हायरसवरील लस शोधली आहे. भारतासाठी ही अत्यंत कौतुकास्पद बातमी आहे.

Coronavirus outbreak | photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Corona Virus) आतापर्यंत 500 हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. अद्याप या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र, ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाने कोरोना व्हायरसवरील लस (Corona Virus Vaccine) शोधली आहे. भारतासाठी ही अत्यंत कौतुकास्पद बातमी आहे.

ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक एँड इंड्रस्ट्रियल रिसर्च ऑर्गेनायझेशनच्या (Commonwealth Scientific and Industrial Research Organisation) (CSIRO) काही शास्त्रज्ञांनी या विषाणूवर लस निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे काम केले आहे. यासंदर्भात केलेल्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व एका अनिवासी भारतीयाने केले आहे. यासंदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त प्रकाशित केले आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 20 हजार रुग्णांना ठार मारणार? चीन सरकारची कोर्टाकडे याचिका)

ऑस्ट्रेलियातील डोहर्टी इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना मागील आठवड्यात कोरोना व्हायरसचा विषाणू मानवी शरीरातून विलग करण्यास यश मिळाले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक एँड इंड्रस्ट्रियल रिसर्च ऑर्गेनायझेशनमधील प्राध्यापक एस. एस. वासन यांनी सांगितले की, डोहर्टी इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी तात्काळ संशोधन करून कोरोना व्हायरसवरील लस निर्माण करण्याचा दिशेने पाऊल टाकले आहे. प्रतिबंधित लसीची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या वेगाने केल्या जातील. तसेच ऑस्ट्रेलियन ऍनिमल हेल्थ लॅबोरेटरीमधील माझे सहकारी या संदर्भात निरीक्षणे, निदान आणि प्रतिसाद नोंदविण्याचे काम करत असल्याचेही वासन यांनी यावेळी सांगितले.