IPL Auction 2025 Live

Niagara Falls: नायगरा धबधब्यावर तिरंग्याची रोषणाई करुन असे झाले भारतीय स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन (Watch Video)

तसेच न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात रोषणाई करण्यात आली आहे.

Naigara Falls Tricolour (Photo Credits: ANI)

काल, 15 ऑगस्ट रोजी भारतात 74 वा स्वातंत्र्यदिन (Indian Independence Day)  साजरा करण्यात आला, या खास क्षणाचे सेलिब्रेशन साता समुद्राच्या पार सुद्धा करण्यात आले. वेळेच्या फरकानुसार आज कॅनडा (Canada) मधील नायगरा धबधब्यावर (Naigara Fall) तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. कॅनडा मध्ये राहणार्‍या भारतीयांंसाठी दरवर्षी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात येते मात्र यंंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर Ottawa Indian High Commission सह Toronto आणि Vancouver मध्ये काऊन्सलेट मध्ये ऑनलाईन ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान या रोषणाईचा व्हिडिओ सध्या ANI या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे, यातील नयनरम्य दृश्य पाहुन तुम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

सर्व भारतीयांंच्या वतीने या बोलताना कॅनडामध्ये नायगरा फॉल्स , CN Tower आणि Toronto sign वर अशाप्रकारे भारताचा तिरंगा फडकणं ही अभिमानाची बाब असल्याची भावना India’s Consul General to Toronto अपूर्व श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

नायगरा धबधब्यावर तिरंग्याची रोषणाई

दरम्यान, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात रोषणाई करण्यात आली आहे. वेळेच्या फरकानुसार आज अमेरिकेत भारताचा स्वातंंत्र्य दिन साजरा केला जात आहे.

Empirer State बिल्डिंगवर तिरंग्याची रोषणाई

दुसरीकडे नायगरा धबधब्यावर 15 ऑगस्टच्या संध्याकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तर आज रविवारी (16 ऑगस्ट) दिवशी CN Tower वर ध्वजारोहण होईल असे समजत आहे.