Dhol-Tasha in New York: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; भारतीयांकडून मराठमोळ्या ढोल-ताशा वादणाचे सादरिकरण (Watch Video)

ते ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे आगमन झाले.

Photo Credit- X

Dhol-Tasha in New York: या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्याबरोबरच ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही भाषण करणार आहेत. (हेही वाचा: Tirupati Laddu Row: ‘धर्म पुनर्स्थापित करण्याची वेळ आली’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली 11 दिवसांच्या तपश्चर्येची घोषणा)

प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करणारे समविचारी देशांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ‘क्वाड’ उदयास आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितले. दरम्यान, अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीयांकडून जंगीस्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतात मराठमोळ्या ढोल-ताशाचे वादण करण्यात आले. यावेळी वादण पथकाने पारंपरिक पोषाखात सादरिकरण केले.

भारतीयांकडून मराठमोळ्या ढोल-ताशा वादणाचे सादरिकरण

विल्मिंग्टन, डेलावेअर येथे ‘क्वाड’ देशांची शिखर परिषद आणि न्यूयॉर्कमधील ‘भविष्यातील शिखर परिषदे’दरम्यान पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांबरोबरही स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमधील भारतीयांशी संवाद साधला. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सेमिकंडक्टर्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबरोबरच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभाग घेणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif