अजब देश! लग्न केल्यावर २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज, ३ अपत्ये झाल्यास कर्ज माफ, 4 अपत्यांवर आयुष्यभर राहा Tax Free

विक्टर ऑर्बन यांनी घोषणा केली आहे की, 40 वर्षांखालील महिला जर पहिल्यांदा विवाह करत असेल तर, तिला 25 लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी स्वरुपात दिले जाईल. तर, एखाद्या महिलेने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यास तिचे संपूर्ण कर्ज (25 लाख रुपये) माफ केले जाईल.

Sex policy for Family of Hungarian country | (Photo credit: archived, edited, representative image)

Sex policy for Family of Hungarian country: 'हम दो हमारे दो' असे म्हणत भारतातील अनेक जोडपी कुटुंबनियोजन करु पाहात आहे. सरकारनेही नागरिकांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व विविध स्तरांवरुन पटवून देत लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भारताचा शेजारी देश चीनने तर लोकसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम हाती घेत लोकसंख्या वाढीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणले आहे. जगभरातील अनेक देश वाढत्या लोकसंख्येमुळे हैराण आहेत. तर, दुसऱ्या बाजूला अगदी त्याच्या विरुद्ध स्थिती आहे. यूरोपीय देशांपैकी एक असलेल्या हंगेरी (Hungary) या देशात लोकसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या देशात एका योजनेखाली तब्बल 25 लाख रुपयांचे कर्ज सरकार चक्क माफ करते. हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन (Hungarian Prime Minister Viktor Orban) यांनी नुकतीच एक घोषणा जाहीर केली. विक्टर ऑर्बन यांनी घोषणा केली आहे की, 40 वर्षांखालील महिला जर पहिल्यांदा विवाह करत असेल तर, तिला 25 लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी स्वरुपात दिले जाईल. तर, एखाद्या महिलेने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यास तिचे संपूर्ण कर्ज (25 लाख रुपये) माफ केले जाईल.

छप्पर फाड के सवलत

तुम्ही लग्न, तीन अपत्ये आदींवरची सवलत वाचलीत. खरी गंमत तर पुढेच आहे. या देशात (Hungary) जर एखाद्या महिलेने 4 अपत्यांना जन्म दिला तर, छप्पर फाडके सवलतींची बरसात होते. 4 अपत्ये जन्माला घालणाऱ्या महिलेला कर्जमाफीचा लाभ तर मिळतोच. पण, चक्क आयुष्यभर कर सवलत (Tax concession) मिळते. म्हणजेच ही महिला त्या देशात आयुष्यभर टॅक्स फ्री (Tax Free) राहू शकते. विशेष म्हणजे इथे 3 अपत्ये जन्माला घालणाऱ्या कुटुंबाला 7 सीट्सची गाडी खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपयांची मदत मिळते. प्राप्त माहितीनुसार, या देशात लोकसंख्येची घनता खपूच कमी आहे. इथले जन्मदर प्रमाणही प्रचंड कमी आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्याबाबत धोका निर्माण झाला असून, स्थलांतरीत लोकांवरी अवलंबित्व (Dependence on migrant people) कमी करुन देशाचे भविष्य वाचविण्यासाठी सरकारने ही मोहीम प्रोत्साहनपर सुरु केली आहे.

देशाचे भविष्य वाचविण्यासाठी लोकसंख्या वाढ महत्त्वाची

Annual State of the Nation समोर भाषण करताना पंतप्रधान विक्टर ऑर्बन (Hungarian Prime Minister Viktor Orban) यांनी सांगितले की, इतर देशांतून खास करुन मुस्लीम देशांतून स्थलांतरीत लोकांना आपल्या देशात प्रवेश देण्यापेक्षा प्रजोत्पादन प्रमाण वाढून म्हणजेच अधिकाधिक मुले जन्माला घालून हंगेरियन मुलांची संख्या वाढवने हे केव्हाही चांगले आहे. (हेही वाचा, Breast ironing: हजारो स्त्रियांचे स्थन जाळले; पुरुषांपासून बचाव करण्यासाठी इंग्लंड, अफ्रिकेत मुलींवर अघोरी उपाय, स्थनांच्या कर्करोगाचा धोका)

हंगेरीचे धक्कादयक वास्तव आणि भविष्य

प्राप्त माहितीनुसार हंगेरीची विद्यमान लोकसंख्या आहे. 97.8 लाख इतकी. तर लोकसंख्या घटन्याचे प्रमाण आहे प्रतिवर्ष साधारण 32 हजार इतके. म्हणजे प्रतिवर्ष हंगेरीतील लोकसंख्या 32 हजारांनी घटते. हंगेरीतील महिलांच्या सरासरीत मुलांचे प्रमाण 1.45 इतके आहे. यूरोपीय संघाच्या तुलनेत हे प्रमाण 1.58 पेक्षा कमी आहे. यूरपीय संघात फ्रान्स हा देश यात आघाडीवर आहे. फ्रान्स देशातील महिलांच्या सरासरीत मुलांचे प्रमाण 1.96 इतके आहे. या यादीत स्पेन सर्वात खाली आरहे. इथे या सरासरीत 1.33 मुले आहेत. जगाचा विचार करता सर्वात अधीक प्रजनन दर पश्चि अफ्रीकेतील नाईजर (Niger) येथे आहे. इथला प्रजनन दर प्रति महिला 7.24 मुले असा आहे.