US President Salary Per Month: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरमहा किती मिळत मानधन? आकडा पाहून धराल डोकं

तर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीला वर्षभरात 400,000 डॉलर (3.36 करोड़ रुपये) इतकं वेतन मिळतं.

Photo Credit- X

US President Salary Per Month: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जगभरात चर्चा आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या या देशाचं अध्यक्षपद नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. जगातील सर्वात मोठी महासत्ता असल्याने देशाच्या राष्ट्राध्यक्षांना या सेवेसाठी दर महिन्याला किती वेतन मिळते (Salary of US President) ते जाणून घेऊत. राष्ट्राध्यक्षाला वेगळी वेतनश्रेणी लागू असते. त्याशिवाय, वाढीव भत्ते, ट्रॅव्हलींग अलाऊन्स, एंटरटेन्मेंट अलाऊन्स, पेंशन आणि इतर सुविधाही मिळतात.

फक्त पगारावरच ही गणितं थांबत नाहीत. तर, राष्ट्राध्यक्षांना वाढीव भत्तेदेखील असतात. ट्रॅव्हलींग अलाऊन्स आणि एंटरटेन्मेंट अलाऊन्सही मिळतो. पदावरून निवृत्त झाल्यानंतर या मंडळींना पेंशन आणि इतर सुविधाही मिळतात. (हेही वाचा: US Presidential Election 2024: राष्ट्राध्यक्ष पद निवडणूकीसाठी New York मध्ये Ballot Papers वर बंगाली भाषेचाही समावेश)

राष्ट्राध्यक्षांना या पदावर निवडून आल्यानंतर व्हाईट हाऊसला नव्यानं सजवण्यासाठी 100,000 डॉलर च्या जवळपास रक्कम मिळते, असं बीबीसीच्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला मात्र कोणतीही रक्कम मिळत नाही. पगाराव्यतिरिक्त अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना लिमोसिन, द बीस्ट, मरीन वन आणि एयर फोर्स वनमध्ये मोफत प्रवासाची सुविधा असते. याशिवाय व्हाईट हाऊसमध्येही मोफत मुक्कामाची संधी मिळते. वर्षभर आरोग्यावरील खर्चासाठीची रक्कम, अधिकृत प्रवासासाठीचा संपूर्ण खर्च आणि वर्षभराला 200,000 डॉलर (1.68 करोड़ रुपये) पेंशन स्वरुपातील रक्कम हा लाभही लागू असतो.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष हे सर्वोच्च नागरी पद आहे. त्यांना 50,000 डॉलर भारतीय चलनानुसार 42 लाख रुपये एक्सपेंस अलाउंस असतो. 100,000 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 84 लाख रुपये नॉन टेक्सेबल ट्रेवल अलाउंस असतो. 19,000 डॉलर म्हणजेच 16 लाख रुपये एंटरटेनमेंट अलाउंस असतो. ही संपूर्ण रक्कम मिळून 569,000 डॉलर (4.78 करोड़ रुपये) वर पोहोचतो.