Pakistan Shocker: पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार, स्तन कापले; कातडी सोलून हत्या- मीडिया रिपोर्ट

बलात्कारानंतर पीडित महिलेचे स्तन आणि प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला.

Representational Image (Photo Credits: File Image)
Hindu Woman Beheaded in Pakistan: पाकिस्तानमध्ये एक अतिशय धक्कादायक घना घडली आहे. ज्यामुळे अनेकांचा थरकाप उडाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानातील एका 40 वर्षीय हिंदू महिलेवर (Hindu Woman) सामूहिक बलात्कार (Gang Rape  in pakistan) करण्यात आला आहे. बलात्कारानंतर पीडित महिलेचे स्तन आणि प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला. नराधम इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी पीडितेची शरीरावरची त्वचाही सोलून काढली. त्यानंतर तिचे शीर धडावेगळे करण्यात आले. पीडित महिला हिंदू भील (Diya Bheel) असल्याची माहिती आहे. तिची हत्या केल्यानंर आरोपींनी तिचा मतदेह गव्हाच्या शेतात फेकून दिला.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतत (Sindh province)  असलेल्या संघार जिल्ह्यात (Sanghar District) ही घटना घडली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वत्तानुसार पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कोणावर गुन्हा नोंदविण्यात आला नाही. तसेच, कोणालाही ताब्यातही घेण्यात आले नाही. (हेही वाचा - Pune Gang Rape: पुणे येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहा जण पोलिसांच्या ताब्यात)
इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सोसायटी (IFFRAS) च्या एका अहवालात पुढे आलेल्या माहितीनुसार, पाठिमागील काही काळापासून पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने धर्मांत आणि हिंदू, ख्रिश्चन धर्मियांच्या मुली पळवून नेण्याच्या घटना अधिक प्रमाणात वाढल्या आहेत. अद्यापही अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटनांची भीती कायम आहे. (हेही वाचा - Gang Rape in a Moving Car: आगरा येथे चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांत तक्रार दाखल)
पाकिस्तानमध्ये माजी न्यायमूर्तींनी 10 डिसेंबर 2022 रोजी पाकिस्तानमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, 2019 ते 2022 या कालावधीत ख्रिश्चन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्याची शंभर प्रकरणे घडली आहेत. अहवालात म्हटले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून येते की, घटनांची दखलच घेतली जात नाही. त्यामुंळे ते अधिकतरित्या रेकॉर्डवर येत नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये अल्पसंख्याक कुटुंबातील लोक स्वत:च तक्रार देत नाहीत.