Bangladesh Shocker! बांगलादेशात हिंदू मुलीची श्रद्धाप्रमाणे हत्या; आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकले

अबू बकर (Abu Bakar) आणि कविता राणी (Kavita Rani) यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर अबू बकरने आपल्या प्रियसीला ठार मारले.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Bangladesh Shocker: दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) च्या हत्येप्रमाणेच बांगलादेशात कृर हत्येची घटना समोर आली आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने 18 मे रोजी तिची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. अशाच पद्धतीने बांगलादेशातही एका हिंदू मुलीच्या निर्घृण हत्येचे प्रकरण समोर आले आहे. अबू बकर (Abu Bakar) आणि कविता राणी (Kavita Rani) यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर अबू बकरने आपल्या प्रियसीला ठार मारले. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. अबू बकरने तिचे तुकडे नाल्यात फेकून दिले. तसेच धडापासून डोके वेगळे करून ते पॉलिथिनमध्ये पॅक करून भाड्याच्या घरात ठेवले.

दरम्यान, 6 नोव्हेंबर रोजी अबू बकर कामावर न आल्याने ट्रान्सपोर्ट फर्मच्या मालकाने एका कर्मचाऱ्याला त्याच्या घरी पाहण्यासाठी पाठवले. अबू बकर तेथे सापडला नाही. यावेळी त्याच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. ही बाब मालकाला कळताच त्यांनी अबू संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचे कुलूप तोडले. पोलिसांना फ्लॅटमध्ये पॉलिथिनमध्ये मृतदेहाचे डोके आढळले. (हेही वाचा - Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी Aaftab ने श्रद्धाला केलं होतं रुग्णालयात दाखल; मुंबईतील डॉक्टरांचा खुलासा)

या खळबळजनक गुन्ह्यानंतर पोलिसांनी अबू बकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अबूसह त्याची लिव्ह-इन पार्टनर सपनाला अटक केली. बांगलादेश रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, अबू बकर आणि सपना गोबरचका चौरस्त्याजवळ गेल्या 4 वर्षांपासून राहत होते. मात्र, कविता राणी आणि अबू 5 दिवसांपूर्वीच एकमेकांना भेटले होते. यादरम्यान ते एकमेकांच्या खूप जवळ आले. यानंतर अबूने तिची हत्या करून त्याचे अनेक तुकडे केले.

प्राप्त माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी सपना कामावर असताना अबू बकरने कविताला घरी बोलावले होते. सपना कामावरून परत आली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर अबूने कविताचा गळा दाबून खून केला. त्याने शरीरापासून शीर कापले. त्याने कविताच्या हाताचे अनेक तुकडे करून ते नाल्यात फेकले. तिचे डोके पॉलिथिनच्या पिशवीत भरले आणि शरीराचे उर्वरित अवयव एका बॉक्समध्ये बंद केले. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की, हत्येच्या रात्री अबूने त्याची लिव्ह-इन पार्टनर सपनासोबत घर सोडले आणि रूपसा नदी पार करून तो ढाक्याला रवाना झाला. मात्र कविताचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि दुसऱ्याच दिवशी अबूला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांनाही बासन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चौरस्ता परिसरातून अटक केली. पोलिसांनी आरोपींना सोनडांगा पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. अबूने कोठडीत या गुन्ह्याची कबुली दिली आहे.