Hezbollah Chief Warning: ही युद्धाची घोषणा मानली जावी, हल्ल्यानंतर हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहची इस्रायलला धमकी

नसराल्लाह यांनी इस्रायलला कडक शब्दात इशारा देत हे स्फोट केवळ दहशतवादी कृत्य नसून युद्धाची घोषणा म्हणून पाहिले पाहिजे, असे म्हटले आहे. गुरुवारी आपल्या भाषणात त्यांनी या हल्ल्यांसाठी इस्रायलला थेट जबाबदार धरले आणि याला हिजबुल्लाहविरुद्धचे मोठे षडयंत्र म्हटले.

Hezbollah Chief Warning

Hezbollah Chief Warning: लेबनीज सशस्त्र गट हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांनी लेबनॉनमधील मालिका पेजर बॉम्बस्फोटांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नसराल्लाह यांनी इस्रायलला कडक शब्दात इशारा देत हे स्फोट केवळ दहशतवादी कृत्य नसून युद्धाची घोषणा म्हणून पाहिले पाहिजे, असे म्हटले आहे. गुरुवारी आपल्या भाषणात त्यांनी या हल्ल्यांसाठी इस्रायलला थेट जबाबदार धरले आणि याला हिजबुल्लाहविरुद्धचे मोठे षडयंत्र म्हटले. या घटनेद्वारे इस्रायलने रेषा ओलांडली असल्याचे हिजबुल्ला प्रमुख म्हणाले. लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाह सदस्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या 4,000 हून अधिक पेजरचा मंगळवारी रात्री एकाच वेळी स्फोट झाला, या घटनेत 12 लोक ठार झाले आणि 3,000 हून अधिक जखमी झाले, असे ते म्हणाले, या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, जेव्हा मृत व्यक्तींची अंतयात्रा काढण्यात आली, तेव्हा वॉकीटॉकी स्फोट झाले, ज्यामध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नसराल्लाह यांनी इशारा दिला की, हिजबुल्लाह इस्रायलचा बदला घेण्यापासून मागे हटणार नाही. इस्रायलकडून कितीही हल्ले झाले तरी हिजबुल्ला आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी लढत राहील, असे ते म्हणाले. या धमकीनंतर परिसरात तणाव आणखी वाढला आहे. हे देखील वाचा:  No Pagers, Walkie-Talkies In Flights: लेबनॉन फ्लाइटमध्ये पेजर, वॉकी-टॉकी घेऊन जाण्यास बंदी: कतार एअरवेज

इस्रायलचे हवाई हल्ले आणि हिजबुल्लाहचे प्रत्युत्तर

नसराल्लाह यांचे भाषण प्रसारित होत असताना, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये देरकानुन अल-नहार, झिबकिन, मारबा आणि इतर अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले प्रामुख्याने दऱ्या आणि जंगली भागात केले गेले, जिथे हिजबुल्लाचे तळ होते.

अल मनार टीव्हीच्या वृत्तानुसार, नसराल्लाह म्हणाले की, हे हल्ले हिजबुल्लाला कमकुवत करण्याच्या इस्रायलच्या उद्देशाचा एक भाग आहेत. पण हिजबुल्ला आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्याला प्रत्युत्तर देईल. नसराल्लाह म्हणाले की, इस्रायलवर सूडाची कारवाई केली जाईल आणि त्यांची संघटना हे युद्ध थांबवण्यास तयार नसून ते आणखी वाढवेल.

पेजर स्फोटानंतर लेबनॉनमध्ये सुरक्षा सतर्कता

लेबनॉनच्या अंतर्गत सुरक्षा दलांनी सांगितले की, बॉम्बस्फोट वायरलेस सेट आणि पेजरला, विशेषतः बेरूतच्या दक्षिणी उपनगरात झाले. हे भाग हिजबुल्लाचे गड मानले जातात. स्फोटांनंतर लेबनॉनच्या अनेक भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, इस्रायलने या हल्ल्यांची औपचारिक जबाबदारी घेतलेली नाही. पण पेजर स्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी लष्कराला नव्या रणनीती अंतर्गत तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लेबनॉनमध्ये कडक सुरक्षा उपाय

लेबनॉनच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालकांनी हल्ल्यानंतर प्रवाशांना विमानात पेजर आणि वॉकी-टॉकी ठेवण्यास बंदी घातली आहे. या उपकरणांच्या स्फोटानंतर हा आदेश देण्यात आला असून त्यामुळे देशातील सुरक्षेची चिंता वाढली आहे. लेबनॉनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यांना "देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेवरील निर्लज्ज हल्ला" असे संबोधले आणि चेतावणी दिली की ते एका व्यापक युद्धाच्या सुरुवातीचे संकेत देऊ शकतात.

गाझाला पाठिंबा 

इस्रायलचे गाझावरील युद्ध संपेपर्यंत हिजबुल्लाह दक्षिण लेबनॉनमध्ये आपल्या कारवाया सुरू ठेवेल यावर हसन नसराल्लाह यांनी भर दिला. "लेबनॉनमधील प्रतिकार गाझा, वेस्ट बँक आणि सर्व अत्याचारित लोकांच्या समर्थनापासून मागे हटणार नाही," ते  म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif