Heat Wave in Pakistan: पाकिस्तानमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर; हजारो नागरिक रुग्णालयात दाखल, तापमानाचा पारा 51 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
पाकिस्तानमध्ये सध्या तीव्र उष्णतेमुळे हजारो नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
Heat Wave in Pakistan: उष्णतेच्या लाटेत तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शुक्रवारी पाकिस्तानभरातील हजारो उष्माघातग्रस्तांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तान हा दक्षिण आशियाई देश आहे. तेथे चौथ्या दिवशी उष्णतेने थैमान घातले आहे. विशेष म्हणजे हे तापमान आणखी आठवडाभर तसेच राहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याचे प्रमुख रोमिना आलम यांनी सांगितले. (हेही वाचा: Pakistan’s Schools Closed Heat Wave Warning: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात उष्णतेची तीव्र लाट, 25 ते 31 मे पर्यंत सर्व शाळा राहणार बंद)
शनिवारी तापमान 51 अंशांपर्यंत पोहोचू शकते, असे देशाचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज यांनी सांगितले.“हे अक्षरशः नरकात जगण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जळत्या निखाऱ्यांवर चालल्यासारखे वाटते,” रिक्षाचालक झीशान खान शनी यांनी सांगितले. “हे असह्य आहे. मला माझ्या मुलींची काळजी वाटते. त्यांना वाढत्या तापामानामुले काही होऊ नये, ”असीफ शकूर, पूर्वेकडील लाहोर शहरातील एक माता त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
उन्हापासून संरक्षण म्हणून पाकिस्तान सरकारने गेल्या आठवड्यात शाळा तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश दिले होते. परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. सध्या उष्णतेची लाट सुरू झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.