पाकिस्तानने FATF मध्ये भारताविरुद्ध लावले आरोप, ग्रे लिस्ट नंतर आता ब्लॅक लिस्टमध्ये पाकचे नाव येणार
पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) मधील संबंधात तणाव अद्याप सुरु आहे.
पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) मधील संबंधात तणाव अद्याप सुरु आहे. बालकोट (Balkot) येथे भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर या दोन्ही देशातील तणावाची स्थितीत अधिक वाढ झाली आहे.त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध हे ओआईसी (Organisation of Islamic Cooperation) नंतर आता एफएटीएफ (Financial Action Task Force) मध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकेमकांसमोर आले. भारताने केलेल्या मोठ्या कारवाईबद्दल घाबरलेल्या पाकच्या एफएटीएफने असे म्हटले की, भारताने अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे. तसेच भारताने केलेल्या कारवाईनंतर ते पाकिस्तान सोबत दुश्मनांसारखा व्यवहार करत आहेत.
पाकिस्तानला शांती हवी आहे, परंतु भारताकडून असे काही दिसून येत नाही आहे. त्यामुळे भारताला संस्थेच्या रिव्हू बॉडी मधून घटवले पाहिजे. भारताने पाकिस्तानसोबत नेहमीच नकारत्मक पद्धतीने वागणुक दिली आहे. त्याचसोबत भारत हा एफएटीएफच्या नावावर राजकरण करत असल्याचा आरोप पाकिस्तानने लावला आहे.(हेही वाचा-पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी देणार नाही - इम्रान खान)
याविरुद्ध भारताने पाकिस्तानला एफएटीएफ मधून ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी केली आहे. ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचे नाव यापूर्वीपासून असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याने त्याला एफएटीएफ मधून ब्लॅक लिस्ट करावे. गेल्या वर्षी जून महिन्याच पाकिस्तानला एफएटीफने ग्रे लिस्ट मध्ये टाकले होते. तसेच दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी झाल्याने त्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली जात आहे.