Elisa Leonida Zamfirescu Google Doodle : रोमानियाच्या पहिल्या माहिला इंजिनिअरला 131व्या जयंती दिवशी Google ची खास मानवंदना
मुलींना फिजिक्स (भौतिकशास्त्र) आणि केमिस्ट्री रसायनशास्त्र शिकवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.
आज जगातील दुसरी आणि रोमानियाची पहिली महिला इंजिनियर, Elisa Leonida Zamfirescu (एलिसा लियोनिडा ज़ामफ़िरेस्कू ) यांची 131 वी जयंती आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गूगलने खास गूगल डुडलच्या (Google Doodle) माध्यमातून आदरांजली व्यक्त केली आहे. General Association of Romanian Engineers (A.G.I.R) च्या त्या पहिल्या महिला सदस्य होत्या.
एलिसा मूळच्या रोमानियाच्या होत्या. 10 नोव्हेंबर 1887 साली त्यांचा रोमानियातील गुलाटी येथे जन्म झाला. अनेक अडथळे पार पाडत एलिस यांनी आपले इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केले. स्कुल ऑफ हायवे अँड ब्रिजेस, बुखारेस्ट येथे त्यांनी इंजिअरिंग करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळेस महिला आहे म्हणून एलिसाचा प्रवेश अर्ज नाकारण्यात आला होता. मात्र एलिसा आपल्या निर्णयावर ठाम होती. जर्मनीमधील रॉयल टेक्निकल अकॅडमीमध्ये एलिसाने प्रवेश मिळवला. 1909 साली एलिसाचा अर्ज स्वीकारण्यात आला. मात्र जर्मनीमध्येही एलिसाला अनेक भेदभावांचा सामना करावा लागला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर एलिसा मायदेशी परतली. सुरुवातीला जिऑलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ रोमानिया येथे एलिसाने काम केले. जागतिक महायुद्धाच्या दरम्यान ऐलिसाने रेडक्रॉस सोबत काम केले. रोमानियामध्ये तांबे, कोळसा, बॉक्स साईट या नैसर्गिक संसाधनातून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये उल्लेखनीय काम केले. यासाठी त्यांचा रोमानियामध्ये गौरव करण्यात आला. एलिसा यांनी 25 नोव्हेंबर 1973 साली जगाचा निरोप घेतला. मुलींना फिजिक्स (भौतिकशास्त्र) आणि केमिस्ट्री रसायनशास्त्र शिकवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.