घाबरलेल्या पाकिस्तानचे लोटांगण: शांततेसाठी एक संधी द्या, भारताने पुरावे दिल्यास तत्काळ कारवाई करु: इमरान खान
भारताने पुलवामा हल्ल्याबाबत योग्य पूरावे दिल्यास आम्ही तात्काळ कारवाई करु', असे इमरान खान यांनी म्हटले आहे. दरम्यान, 'भारताने आम्हाला शांततेसाठी एक संधी द्यावी' असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे मदतीची याचना करत, 'शांततेसाठी एक संधी द्या, मी माझ्या शब्दावर ठाम असेन. भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Terror Attack) गुप्त पुरावे पाकिस्तानला दिले तर, दोषींना अटक करु' असे अश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थान येथील एका सभेत बोलताना, 'दहशतवादाविरोधात जगभरात आवाज उठतो आहे. जगातील अनेक देश दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढत आहेत. भारतही दहशतवादाच्या विरोधात आहे. या वेळी हिशोब पक्का केला जाईल. हा बदललेला भारत आहे. भारत आता पूर्वीसारखा राहिला नाही. पुलवामाची वेदना भारत विसरणार नाही. दहशतवाद्यांना कसे निपटायचे हे भारताला चांगलेच माहिती आहे.'
राजस्थान येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इमरान खान यांच्याबाबतची आठवण सांगितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, 'इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले तेव्हा आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. या वेळी बोलताना इमरान खान म्हणाले होते आपण पठाणचा मुलगा आहोत. जो शब्द देतो तो पाळतो. आता बघूया इमरान खान यांची कसोटी आहे. ते शब्द पाळतात की काय करतात.'
दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार 'पंतप्रधान इमरान खान आपल्या शब्दावर अद्यापही ठाम आहेत. भारताने पुलवामा हल्ल्याबाबत योग्य पूरावे दिल्यास आम्ही तात्काळ कारवाई करु', असे इमरान खान यांनी म्हटले आहे. दरम्यान, 'भारताने आम्हाला शांततेसाठी एक संधी द्यावी' असेही पाकिस्तानने म्हटले आहे. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: भारत-पाकिस्तान मधील परिस्थिती अत्यंत वाईट आणि भयानक; पुलवामा हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका)
इमरान खान यांनी भारताला 19 फेब्रुवारी रोजी विश्वास दिला होता की, ते पुलवामा हल्ल्यासाठी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करतील. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने स्वीकारली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तारादाखल कारवाई करु नये यासाठी पाकिस्तानने भारताला असा विश्वास दिला होता. मात्र, पुलमावा हल्ल्याची चौकशी हे पाकिस्तानकडून नाटक असल्याचे भारताने म्हटले आहे.