PM Modi 100 Million Followers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम, X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक पहिले नेते; इलॉन मस्क यांच्याकडून अभिनंदन

जगात कोणत्याच देशाच्या अध्यक्षांना हा विक्रम करता आलेला नाही.

Photo Credit- X

PM Modi 100 Million Followers: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते असल्याबद्दल टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे(PM Modi on X) अभिनंदन केले आहे. X वर पोस्ट करत मस्क म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात जास्त फॉलो केले जाणारे जागतिक नेते असल्याबद्दल अभिनंदन!' दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे एक्सवर 100 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. जगभरात कोणत्याच राजकीय नेत्याला आजपर्यंत एवढे फॉलोअर्स मिळालेले नाहीत. तो विक्रम मोदींनी त्यांच्या नावावर केला आहे. (हेही वाचा: Meta Suspends Generative AI Tools: मेटा प्लॅटफॉर्मचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्स हटविण्याचा निर्णय)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ज्यांचे सध्या 38.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम 11.2 दशलक्ष. पोप फ्रान्सिस 18.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जागतिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदी खूप पुढे आहेत. टेलर स्विफ्ट 95.2 दशलक्ष, लेडी गागा 83.1 दशलक्ष आणि किम कार्दशियन 75.2 दशलक्ष यांसारख्या जागतिक सेलिब्रिटींपेक्षाही पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स जास्त आहेत. (हेही वाचा:BMW Sales Increased In India:2024 च्या पहिल्या सहामाहीत BMW Group India ची भारतात आतापर्यंतची सर्वाधिक कमाई; 7,098 युनिट्सची विक्री )

विराट कोहली 64.2 दशलक्ष, ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियर 63.6 दशलक्ष आणि अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स 52.9 दशलक्ष यासह काही सक्रिय जागतिक क्रीडापटूंच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स अधिक आहेत.

भारतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे 19.9 दशलक्ष, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 7.4 दशलक्ष, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे 6.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तेजस्वी यादव 5.2 दशलक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 29 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत, पीएम मोदींच्या एक्स हँडलने अंदाजे 30 दशलक्ष फॉलोअर्सची वाढ झाली आहे.