Divorce Perfume : संयुक्त अरब आमिरातचे पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेखा महरा (Sheikha Mahra)मोहम्मद रशीद अल मकतूम ही नेहमीच चर्चेत असते. राजकुमारी शेखा महरा ही तिच्या मुक्त विचारांमुळे, व्यवसाय, सामाजिक कार्य, लग्नामुळे चर्चेत राहिली. आता तिच्या डीवॉर्समुळे चर्चेत असतानाच तिने एक नवा परफ्युम लॉन्च केलाय त्यामुळे ती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. जुलै महिन्यात राजकुमारी शेखा महरा हिने इन्स्टाग्रावर पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम याला सार्वजनिकरित्या घटस्फोट दिला होता. आता तिने एक नवा परफ्युम लॉन्च(Divorce Perfume) केलाय. त्याला डीवॉर्स (Divorce) असं नाव दिलं आहे. (हेही वाचा:Insta-Divorce: दुबईची राजकुमारी Shaikha Mahra हिने इन्स्टाग्रामवर दिला आपल्या पतीला घटस्फोट, पोस्ट व्हायरल )
शेखा महराने ज्या प्रकारे तिचा घटस्फोट जाहीर केला ते एक धाडसी पाऊल मानलं जातं आहे. तलाक, तलाक, तलाक म्हणत राजकुमारीने पतीबरोबरचे संबंध तोडले होते. त्यानंतर दोघेही भूतकाळ विसरून गेले असतील असं वाटत असतानाच शेखा महराने डायवॉर्स नावाचा परफ्युम लॉन्च केल्याने अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. गेल्यावर्षी 27 मे 2023 रोजी शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी राजकुमारी शेखा महारा हिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांनी गुड न्यूज दिली. शेख महरा हिने सोनोग्राफीचा फोटो स्टोरीवर शेअर करत त्यांनी ही बातमी जगाला दिली होती. पण मुलीचा जन्म होताच दोन महिन्यांनी शेखा महरा हिने पतीला घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर या परफ्युममुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
शेखा महरा कोण आहे ?
शेखा महारचा जन्म 26 फेब्रुवारी 2023 मध्ये युएईतल्या दुबईत झाला. शेख महरा 30 वर्षांची आहे. शेखा महारची आई ग्रीसची असल्याने राजकुमारीकडे अमीराती आणि ग्रीस अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. शेख महराचं प्राथमिक शिक्षण दुबईतल्या एका खासगी शाळेत झालं. त्यानंतर उच्च शिक्षण लंडनमध्ये झालं. तिने ब्रिटनमधल्या एका विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन या विषयात पदवी घेतली आहे.
मोहम्मद बिन राशिद यांच्या महाविद्यालयातूनही एक पदवी घेतली आहे. शेखा महरा तिच्या सामाजिक कार्यांसाठी ओळखली जाते. महिला सशक्तीकरण आणि स्थानिक नक्षीकाम करणाऱ्यांना ती पाठिंबा देते. याशिवाय ती घोडेस्वारीसाठीही प्रसिद्ध आहे.
DIVORCE नावाचा परफ्युम केलं लॉन्च
View this post on Instagram
2023 मध्ये लग्न, 2024 मध्ये विभक्त
शेखा महराचं लग्न 2023 मध्ये बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाल. मे महिन्यात शेखा महरा बिंतला एक मुलगी झाली. तिचं नाव शेख महराने माना बिन मोहम्मद अल मकतूम असं ठेवलं आहे. या गोड बातमीला अवघे दोन महिने पूर्ण झाले असतानाच शेखा महराने पतीला घटस्फोट दिला. पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात आहेत, त्यामुळे तो खूप व्यस्त असतो. त्यामुळे मी घटस्फोट देते, असे इन्स्टाग्रामवर लिहित शेखा महराने पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर तिने आणि तिच्या पतीने दोघांनीही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.