Sheikha Mahra Divorces Her Husband On Socia Media: पती-पत्नीच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा समोर येतात, पण तुम्ही कधी राजकन्येने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याचे सोशल मीडियावर पाहिले आहे किंवा ऐकले आहे का? नाही ना? मात्र ता दुबईची राजकुमारी शेखा महारा सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. दुबईच्या शासकाची मुलगी शेखा महारा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूमने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्याची जाहीरपणे इंस्टाग्रामवर घोषणा केली. गेल्या वर्षी मे महिन्यात शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन मना अल मकतूमसोबत तिचा विवाह झाला होता. 12 महिन्यांनंतर या जोडप्याला मुलगी झाली. आता शेखाने तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

दुबईच्या राजकुमारीने इंस्टा पोस्टमध्ये लिहिले- ‘प्रिय पती, तू बाकीच्या साथीदारांमध्ये व्यस्त असल्याने, मी येथे आमच्या घटस्फोटाची घोषणा करते. मी तुला घटस्फोट देतो, मी तुला घटस्फोट देते, आणि मी तुला घटस्फोट देते... तुझी माजी पत्नी.’ शेखा महरा दुबईच्या शासकाच्या 26 मुलांपैकी एक आहे. (हेही वाचा: Viral Video: पेट्रोल पंपावर महिलेने लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)