भारत पाकिस्तान मधील तणाव लवकरच दूर होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

या तणावा दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठे विधान केले आहे.

भारत पाकिस्तानमधील भांडण लवकरच थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा (Photo Credits-Twitter)

भारत आणि पाकिस्तानधील तणाव अधिक वाढत चालल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावा दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मधील तणाव लवकरच मिटणार असल्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत अमेरिका (America) दोन्ही देशांसाठी मध्यस्थीची भुमिका बजावत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, मझ्याकडे भारत पाकिस्तानसाठी चांगली बातमी आहे.या दोन्ही देशात गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अमेरिका या दोन्ही देशांसाठी मध्यस्तीचे काम करत आहे. मला अशा आहे की लवकरच भारत पाकिस्तान मधील तणाव दूर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.(हेही वाचा-India-Pakistan Tension: जैश-ए-मोहम्मदच्या 'मसूर अझहर'ला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव; अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची भारताला साथ)

तसेच बुधवारी रात्री राष्ट्रीय सुरक्षा सलागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांच्यासोबत फोनवरुन बातचीत केली होती. या बाचतचीत मध्ये असे साध्य झाले होते की, भारत पाकिस्तानला प्रतिउत्तर देत आहे ते योग्यच आहे. त्यासोबत आता अमेरिकाही भारतासह तणावाच्या परिस्थित उभा असल्याचे म्हटले होते.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.