Chhatrapati Shivaji Maharaj Statue Mauritius: मॉरिशस मध्ये शिवरायांचे 12 फूटी पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी एका अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशस मध्ये अनावरण झाले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Insta

मॉरिशस मध्येही शिवरायांचा जयजयकार दुमदुमला आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ (Pravind Kumar Jugnauth) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी एका अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले आहे. सध्या मॉरिशस दौर्‍यावर असलेल्या फडणवीस यांनी पुतळ्याच्या अनावरणासोबतच मॉरिशस मराठी फेडरेशनला 8 कोटी रुपये आणि 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महाराष्ट्रीयन समुदायासाठी स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याचीही घोषणा केली आहे.

पहा शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Devendra Fadnavis (@devendra_fadnavis)