Cyclone Mocha Updates: मोचा चक्रीवादळ, म्यानमारमध्ये तीन जणांचा मृत्यू, बंगालमध्ये 'हाय अलर्ट'
चक्रीवादळाने म्यानमादमध्ये (Myanmar) तीघांचा बळी घेतला आहे. वादळाची तीव्रता मोजणाऱ्या पाचव्या श्रेणीत मोडणारे हे वादळ आणखी रौद्र रुप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ मोचा (Cyclone Mocha) म्यानमार आणि बांगलादेशच्या सागरी किनारपट्टीवर धडकले आहे. चक्रीवादळाने म्यानमादमध्ये (Myanmar) तीघांचा बळी घेतला आहे. वादळाची तीव्रता मोजणाऱ्या पाचव्या श्रेणीत मोडणारे हे वादळ आणखी रौद्र रुप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या बाजूला वादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन भारतातील पश्चिम बंगाल ( West Bengal) राज्याच्या सागरी किनारपट्टीवर 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम राज्याच्या ( West Bengal, NDRF Teams) किनारी भागात दाखल झाल्या आहेत.
मोचा चक्रावादळाबद्दल सांगितले जात आहेकी, हे वादळ बंगालच्या उपसागरात साधारण 1982 पासून निर्माण होते. हे वादळ रविवारी दुपारी बांग्लादेश आणि म्यानमारच्या सागरी किनारपट्टीवर सिटवे टाऊनशिप परिसरात धडकेल. वादळाची तीव्रता इतकी होती की, या परिसरातील काही घरांची छप्परं उडून गेली. कमकुवत घरांच्या भींती पडल्या तर किमान तीन लोकांचा मृत्यू झाला. वादळाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला. ज्यामुळे रस्ते उखडले गेले. रत्यांना नद्यांचे रुप आले. झाडे उन्मळून पडली. तर बंराचे शहर सिटवे हे जलमय झाले.
ट्विट
मोचा चक्रीवादळाबद्दल अधिक माहिती देताना हवामान खात्याने म्हटले आहे की, मोचा चक्रीवादळाचा म्यानमारमधील प्रभाव कमी झाला आहे. दरम्यान, वादळ कमकुवत झाले असले तरी वादळाचा प्रभाव अद्यापही कायम दिसत आहे. अनेक लोक बेघर झाले असून, आश्रय शोधत आहेत. अशा नागरिकांसाठी मठ, पॅगोडा आणि शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी मॅनमारमधील चक्रीवादळाचे व्हिडिओ चित्रित केले आहेत. ज्यात अनेक घरांची छते उडाल्याचे, रस्ते पाण्याखाली गेल्याचे आणि वाहने, इमारती आदींची हानी झाल्याचे पाहायला मिळते.
ट्विट
ट्विट
चक्रीवादळाच्या अभ्यासकांनी इशारा दिला आहे की, मोचा चक्रीवादळ बांगलादेशात जवळपास दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली वादळ असू शकते. विश्लेशकांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विविध किनारी भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.