Complex Regional Pain: ऑस्ट्रेलियातील 10 वर्षीय मुलीला मानवी जगतातील सर्वात वेदनादायक स्थितीचे निदान
CRPS हा एक दुर्मिळ आणि असाध्य सिंड्रोम आहे ज्यामुळे तीव्र आणि तीव्र वेदना होतात. या वेदनांबद्दल बोलताना बेला मॅसी हिने सांगितले की, मला प्रचंड वेदना होतात. मला चालता, अंघोळ करता आणि काहीही काम करता येत नाही.
Australian Girl diagnosed with CRPS: ऑस्ट्रेलियातील एका मुलीला अत्यंत वेदनादायक स्थितीचे निदान झाले आहे. ही स्थिती मानवी प्रजातीस प्रचलित असलेल्या वेदनांपैकी सर्वाद वेदनादायी असल्याचा दावा केला जात आहे. बेला मॅसी नामक पीडित मुलगी केवळ 10 वर्षांची आहे. ही स्थिती अशी आहे की, जेव्हा ती हालचाल करते किंवा तिला कोणी स्पर्श करते तेव्हा तिच्या उजव्या पायाला प्रचंड वेदना होतात. न्यू यॉर्क पोस्टने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत फिजी येथे गेली होती. तेव्हा तिच्या उजव्या पायावर फोड आल्याचे निमित्त झाले आणि तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र तिची प्रकृती बिघडतच गेली. अखेर तिला वेदनादायक सिंड्रोम (Complex Regional Pain) जडल्याचे निदान झाले. हा सिंड्रोम मानवी जगतातील 'सर्वात वेदनादायक स्थिती' म्हणून ओळखला जातो.
CRPS लागन झालेल्या पीडितास भयंकर वेदना होतात. ज्यामुळे त्याच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. या सिंड्रोमची लागण जर बालपणात झालीतर त्या मुलाचे बालपण हरवले जाते. GoFundMe ने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, बेला मॅसी भयानक वेदनांशी झुंज देत आहे. ज्यामुळे तिच्या दैनंदिन कामांवर परिणाम झाला असून, तिचे बालपण हिरावून घेतले गेले आहे. बेलाच्या वेदनांचा अर्थ असा आहे की तिने तिच्या उजव्या पायाची आणि पायाची हालचाल गमावली आहे. ती आता अंथरुणाला खिळलेली आहे. तिला फिरण्याची गरज असल्यास व्हीलचेअर वापरावी लागते. तिच्या पायाला थोडाही कशाचा स्पर्श झाला तर प्रचंड वेदाना होता. (हेही वाचा, Zombie Drug Epidemic: काय आहे 'झोम्बी ड्रग्ज'? Xylazine चा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम?)
CRPS हा एक दुर्मिळ आणि असाध्य सिंड्रोम आहे ज्यामुळे तीव्र आणि तीव्र वेदना होतात. या वेदनांबद्दल बोलताना बेला मॅसी हिने सांगितले की, मला प्रचंड वेदना होतात. मला चालता, अंघोळ करता आणि काहीही काम करता येत नाही. माझ्या पायावर मी पांघरुनही घालू शकत नाही. पायाला किंचीतही स्पर्श झाला तर मला प्रचंड वेदना हेतात. लगेच मी दचकून उठते आणि किंचाळते.
(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2023 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

