Coronavirus Outbreak: अमेरिकेत कोरोना व्हायरसचा हाहाकार! मागील 24 तासांत 1,883 कोरोना बाधितांचा मृत्यू
दर दिवशी अमेरिकेत सुमारे 2000 कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे.
कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात वाढत असताना अमेरिकेत कोविड 19 ने अक्षरशः हाहाकार घातला आहे. अमेरिकेत दर दिवशी मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. दिवसागणित अमेरिकेत सुमारे 2000 कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मागील 24 तासांत अमेरिकेत 1883 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या (Johns Hopkins University) माहितीनुसार एएफपी न्यूज एजेन्सीने (AFP News Agency) दिली आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या जवळपास 65000 इतकी प्रचंड आहे. यामुळे इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. (Coronavirus: COVID-19 विषाणू तयार करण्यात आलेला नाही- जागतिक आरोग्य संघटना)
अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणित वाढत असून मृतांचा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत न्युयॉर्क शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत शहरात 18 हजार हून अधिक नागरिकांचा कोरोना संसर्गाने बळी गेला आहे. याशिवाय न्यू जर्सी, मॅसाचुसेट्स, कॅलिफोर्निया आणि पेंसिल्वेनिया या भागातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
ANI Tweet:
जगभरात कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 31 लाख 93 हजार 886 इतकी असून आतापर्यंत 2 लाख 27 हजार 638 नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 9 लाख 72 हजार 719 रुग्ण कोविड 19 च्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.