Covid-19 Vaccine Update: कोविड-19 वरील लस ख्रिसमस पूर्वी उपलब्ध होणार? डिसेंबरमध्ये अमेरिकेत Moderna, Pfizer लसीला मान्यता मिळण्याची शक्यता

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीची कोविड-19 वरील लस आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळावी यासाठी FDA कडे अर्ज दाखल केल्यानंतर अमेरिकेचे हेल्थ सेक्रेटरी Alex Azar यांनी लसीबद्दल अजून एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीची (Moderna Vaccine) कोविड-19 (Covid-19) वरील लस आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळावी यासाठी FDA कडे अर्ज दाखल केल्यानंतर अमेरिकेचे हेल्थ सेक्रेटरी Alex Azar यांनी लसीबद्दल अजून एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात दोन लसी लॉन्च होऊ शकतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिसमसपूर्वी मॉडर्ना इंक (Moderna Inc) आणि फायझर-बायोटेक (Pfizer-BioNtech) लस लॉन्च येण्याची शक्यता वाढली आहे.

आजच्या मॉडर्नाच्या घोषणेनंतर कोविड-19 च्या दोन प्रभावी लसी FDA कडून मंजूरी मिळण्यासाठी दाखल झाल्या आहेत.  मंजूरी मिळाल्यानंतर या लसी आपत्कालीन वापरासाठी वापरता येतील. "आजच्या मॉडर्नाच्या घोषणेनंतर कोविड-19 च्या दोन प्रभावी लसी FDA कडून मंजूरी मिळण्यासाठी दाखल झाल्या आहेत. मंजूरी मिळाल्यानंतर या लसी आपत्कालीन वापरासाठी वापरता येतील. त्याचबरोबर लसीचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी राज्यांसोबत चर्चा सुरु आहे. राज्य सरकार आणि उपाध्यक्ष Mike Pence यांच्यासोबत चर्चा करुन लसीच्या वितरणाचा आराखडा आखणार आहे," असे हेल्थ सेक्रेटरी यांनी CBS  वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. प्रत्येक राज्यांमधील कुठल्या जिल्हांना लसीचे प्रथम वितरण व्हावे, हे त्या राज्याचे गर्व्हनर ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.

US Health Secretary's Tweet:

मॉडर्नाची लस काही कोरोना बाधित रुग्णांमध्ये 100 टक्के परिणामकारक ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या डेटानुसार, ही लस कोविड-19 वर 94.1% प्रभावी आहे. या सोबतच जर्मनीच्या BioNtech ने विकसित केलेली लस 95% यशस्वी आहे. (Covid-19 Vaccine Update: FDA कडून लसीच्या मंजूरीसाठी मॉडर्ना कंपनीकडून अर्ज; कोरोना बाधित काही रुग्णांमध्ये लस 100% परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा)

"लसीच्या मिळालेल्या सकारात्मक निकालांनुसार मॉडर्नाची लस कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी 94.1 टक्के यशस्वी असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खूप महत्त्वाची ठरु शकते. आम्हाला विश्वास आहे की, आमची लस कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये खूप महत्त्वाचे शस्त्र बनेल. जगभरातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरेल," अशी माहिती मॉडर्ना कंपनीचे सीईओ Stéphane Bancel यांनी आज सकाळी दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif