Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जगभरातील संख्या तब्बल 95 लाखांच्याही पुढे; 488,000 पेक्षाही अधिक मृत्यू

जगभरामध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरामध्ये कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारांहून अधिक असलेल्या देशांमध्ये इंग्लंड (43,314), इटली (34,644), फ्रान्स (29,755), स्पेन (28,330), मॅक्सिको (25,060) आणि भारत (14,894) आदी देशांचा समावेश आहे.

Coronavirus | (Photo Credits: PixaBay)

जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या अल्पावधीतच एक कोटींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी (Johns Hopkins University) जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची दैनंदिन आकडेवारी जाहीर करत असते. त्यानुसार जगभारातील कोरोना व्हायर संक्रमित रुग्णांची सख्या आता जवळपास 95 लाख इतकी झाली आहे. यात 488,000 पेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. जॉन्स हॉपकिंन्स युनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइन्स अँण्ड इंजीनियरिंग (CSSE) शुक्रवारी (26 जून) ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जगभरात शुक्रवार सकाळपर्यंत कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 9,583,144 इतकी होती. तर जगभरात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 488,740 इतकी होती.

सीएसएसई (CSSE) ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरामध्ये अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहेत. अमेरिकेत आजघडीला कोरोना संक्रमित 2,418570 रुग्ण आहेत. तर 124,355 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या खालोखाल कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये ब्राझिल देशांचा क्रमांक लागतो. ब्राजिलमध्ये एकूण 1,228,114 रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. तर 54,971 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. (पाहा गेल्या 24 तासात जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची किती वाढली)

जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी

  1. अमेरिका - 2,418,570
  2. ब्राझिल-1,228,114
  3. रशिया-613,148
  4. भारत- 473,105
  5. इंग्लंड- 309,455
  6. पेरू- 268,602
  7. चिली- 259,064
  8. स्पेन- 247,486
  9. इटली- 239,706
  10. ईरान- 215,096
  11. मेक्सिको-202,951
  12. फ्रांस- 197,885
  13. जर्मनी- 193,371
  14. तुर्की- 193,115
  15. पाकिस्तान- 192,970
  16. सऊदी अरब -170,639
  17. बांग्लादेश- 126,606
  18. दक्षिण अफ्रीका- 118,375
  19. कॅनडा- 104,463

जगभरामध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरामध्ये कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजारांहून अधिक असलेल्या देशांमध्ये इंग्लंड (43,314), इटली (34,644), फ्रान्स (29,755), स्पेन (28,330), मॅक्सिको (25,060) आणि भारत (14,894) आदी देशांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now