Coronavirus Update: मृतांची संख्या 902 वर पोहचली; 40 हजारहून अधिक लोकांना लागण
तर, 40 हजारहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनसह (China) संपूर्ण जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत 902 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 40 हजारहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये मोठ्या वेगाने कोरोना विषाणूचा प्रसारण होत असल्याने इतर देशातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या भितीने अनेक देशाने आपली विमानसेवा बंद केली आहे. महत्वाचे म्हणजे, विमानतळावर प्रत्येक प्रवाशांची वेद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन सध्या कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 902 नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, तब्बल 40 हजारहून अधिक लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! चीन मध्ये नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या 30 तासांमध्ये झाली कोरोना व्हायरस ची लागण; अर्भकावर तातडीचे उपचार सुरु
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.
एनआयचे ट्वीट-
केरळमध्ये कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी तेथील सरकारने राज्यावरील आणीबाणी घोषीत केली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोना व्हायरसचे काही रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 3 आणि बलरामपूर येथे एका व्यक्तीला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.