Canada Visa Update: कॅनडा ने रद्द केला सरसकट 10 वर्ष दिला जाणारा Multiple-Entry Visa
ही single-entry किंवा multiple-entry visa साठी सारखीच आहे.
कॅनडा (Canada) मध्ये आता टुरिस्ट व्हिसा (Tourist Visas) म्हणून सरसकट 10 वर्षांसाठी मिळणारा Multiple-Entry Visa रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. Immigration, Refugees and Citizenship Canada कडून गुरूवार (7 नोव्हेंवर)दिवशी देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता नव्या नियमावलीच पालन केले जाईल. प्रत्येकाच्या गरजेनुसार लहान स्वरूपाचा व्हिसा दिला जाईल. विनाकारण त्यांचे वास्तव्य वाढेल अशावर आता निर्बंध घातले जातील.
IRCC च्या माहितीनुसार, तात्पुरत्या immigration levels चे व्यवस्थापन करणे, घरांची कमतरता दूर करणे आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे लक्ष्य आहे. बदलाचा अर्थ असा आहे की कॅनडामध्ये वारंवार येणाऱ्या लोकांना सतत अर्ज करावे लागतील आणि प्रत्येक खेपेसाठीचा तात्पुरता व्हिसा दिला जाईल. त्यामुळे सतत कामासाठी, विरंगुळ्यासाठी येणार्यांना मोठा फटका बसणार आहे.
IRCC ने यापूर्वी multiple entry आणि single entry असा पर्याय ठेवला होता. ज्यामध्ये आधी व्हिसाच्या वैधतेच्या कालावधीत कॅनडामध्ये अनेक वेळा ये-जा केली जाऊ शकत होती. त्यामध्ये 10 वर्षांपर्यंत किंवा पासपोर्टची मुदत संपण्याच्या एक महिन्यापूर्वी, यापैकी जे लवकर असेल तोपर्यंत व्हिसा वाढवण्यास मुभा होती. Canada Immigration Policy: कॅनडाच्या Justin Trudeau सरकारने केले इमिग्रेशन धोरणात मोठे बदल; स्थलांतरितांची संख्या होणार कमी, जाणून घ्या भारतीयांवर काय परिणाम होणार .
आता नव्या नियमानुसार, multiple-entry visas मध्ये आता कमाल मर्यादा ही सरसकट दिली जाणार नाही. आता अर्जदाराच्या व्हिसा का हवा आहे? या कारणावर तो किती काळापर्यंत दिला जाईल हे ठरवलं जाणार आहे.
कॅनडा मध्ये सध्या शिक्षणासाठी येणार्यांवरही मर्यादा आली आहे. तसेच Temporary Foreign Worker Programme देखील अधिक कडक केला आहे.