Queen Elizabeth II of England Passes Away: इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन
वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (8 सप्टेंबर) दुपारी बालमोरल (Balmoral ) येथे राणीचे निधन झाले.
इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन (Britain's Queen Elizabeth passes away) झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (8 सप्टेंबर) दुपारी बालमोरल (Balmoral ) येथे राणीचे निधन झाले. पाठिमागील काही दिवसांपासून एलिजाबेथ यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांचे निधन झाले. इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी आजोबा जॉर्ज पंचम यांच्या शासनकाळात झाला. त्यांचे वडील राजकुमार एल्बर्ट हे राजाचे दुसरे पुत्र होते. पुढे जाऊन ते राजा जॉर्ज VI बनले. त्यांच्या आई एलिजाबेथ, यॉर्क की डचेज ज्या पुढे राणी एलिजाबेथ बनल्या. त्या स्कॉटिश अर्ल क्लाऊडे बोव्स-लॉन यांच्या छोट्या बहिण होत्या. 29 मे रोजी यॉर्कच्या प्रमुख पाद्री कॉस्मो गॉर्डन लँग यांच्याद्वारा त्यांना बर्मिंघम महलातील एका खासगी प्रार्थना घरात इसाई धर्म प्रवेश (बेप्टिजम) देण्यात आला आणि एलिजाबेथ असे त्यांचे नामकरण करण्यात आले.
एलिजाबेथ आपल्या होणाऱ्या पती राजकुमार फिलप यांना भेटल्या होत्या. त्यांची ही भेट 1934 आणि 1937 मध्ये झाली. फिलिप हे त्यांचे दूरचे नातेवाईक होते. पुढे त्यांची अधिक ओळख 1939 मध्ये शाही नौसेना महाविद्यालयात झाली. एलिजाबेथ एका ठिकाणी सांगतात की, त्या 13 वर्षांच्या असतानाच फिलिप यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी त्यांना पत्रव्यवहार सुरु केला. पुढे 9 जुलै 1947 मध्ये त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा झाली.
महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांनी आपल्या काकिर्दीत इंग्लंडच्या जवळपास 15 पंतप्रधानांना शपथ दिली. त्यांनी विन्सटन चर्चिल द्वितीय यांच्यापासून ते रॉबर्ट एंथनी ईडन, मॉरिस हैरोल्ड मैकमिलन, अलेक्जेंडर फ्रेडरिक डगलस, जेम्स हेरोल्ड विल्सन , सर एडवर्ड रिचर्ड जॉर्ज हीथ , लियोनार्ड जेम्स कैलाघन , मार्गरेट थैचर , सर जॉन मेजर , टोनी ब्लेयर, डैविड विलियम डोनाल्ड कैमरन, थेरेसा मैरी मे, बोरिस जॉनसन यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. लिज ट्रस यांच्या रुपात त्यांनी पंधराव्या पंतप्रधानांना शपथ दिली.