Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये मोठा विमान अपघात; 10 जणांचा मृत्यू, 17 जखमी (Watch Video)

त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर आदळल्यानंतर फर्निचरच्या दुकानावर कोसळले.

Photo Credit- X

Brazil Plane Crash: ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात(Gramado) विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या दक्षिणेकडील ग्रामाडोमध्ये शहराच्या व्यावसायिक भागात एक छोटे विमान कोसळले(Brazil Plane Crash). या अपघातात 15 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातामुळे आगीची मोठी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विमान प्रथम एका इमारतीला धडकले. यानंतर ते दुसऱ्या मजल्यावर आदळले आणि नंतर एका फर्निचरच्या दुकानावर पडले. (Brazil Road Accident: ब्राझीलमध्ये भीषण रस्ते अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 22 प्रवाशांचा मृत्यू (Watch Video))

अपघातातून कोणीही वाचले नाही

सिव्हिल डिफेन्सने नऊ मृत्यूची पुष्टी केली आहे. विमानात कोणीही वाचलेले नाही असे राज्य नागरी पोलिसांच्या अंतर्गत पोलिस विभागाचे संचालक क्लेबर डोस सँटोस लिमा यांनी एएफपीला सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते पाइपर चेयेन 400 टर्बोप्रॉप विमान होते. विमानात किती प्रवासी होते आणि किती क्रू मेंबर्स होते याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केलेली नाही. अधिका-यांनी सांगितले की, कमीतकमी 15 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10 जणांचा मृत्यू, 17 जखमी

अपघाताचे कारण अस्पष्ट

अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तपास यंत्रणा घटनेचा तपास करत आहेत. ग्रामाडो हे ब्राझीलचे एक लोकप्रिय पर्यटन शहर आहे. जेथे ख्रिसमसच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. नुकत्याच आलेल्या पुरामुळे ग्रामाडोलाही मोठा फटका बसला होता. मोठी वित्तहानी तेथे झाली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif