Santa Claus बनून Barack Obama नी रुग्णालयातील मुलांना केले गिफ्टचे वाटप (Video)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सँटा क्लाज बनून वॉशिंग्टनमधील चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथील मुलांना गिफ्ट्स दिले.
ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यामुळे सर्व जगभरात या सणाच्या सेलिब्रेशनची धूम आहे. या सणानिमित्तच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (Former US President) बराक ओबामा (Barack Obama) यांनी सँटा क्लाज (Santa Claus) बनून वॉशिंग्टनमधील चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथील मुलांना गिफ्ट्स वाटप केले. बराक ओमाबांनी मदतीसाठी उचललेल्या अनोख्या पावलामुळे त्यांचे सोशल मीडियात भरभरुन कौतूक होत आहे.
57 वर्षांचे ओबामा सँटाच्या पोशाखात हातात गिफ्टने भरलेली पोतडी घेत हॉस्पिटलमध्ये शिरले. त्यांना पाहुन उपस्थितांचा, मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या भेटीत त्यांनी लहान मुलांना गिफ्ट देवून त्यांच्याशी संवादही साधला.
ही घटना व्हिडिओ कैद झाली आणि हा व्हिडिओ चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.
चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलने व्हिडिओवर प्रतिक्रीया देताना ओबानांनी लिहिले की, "सर्व मुले, मुलांच्या कुटुंबियांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मेरी ख्रिसमस आणि सुट्ट्या एन्जॉय करा. सँटा मानून मला आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद."
2009 ते 2017 या काळात ओबामा दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र अजूनतही जनमानसातील त्यांची लोकप्रियता कायम आहे.