Bangladesh Protest: बांगलादेशात विद्यार्थ्यांकडून सुप्रीम कोर्टाला घेराव; सरन्यायाधीशांचा राजीनामा

लोक निराधार झाले असून त्यांना लपून राहावे लागत आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील हल्ले वाढले आहेत.

Violence Continues in Bangladesh (Photo Credits: ANI)

आहे. अशात माजी पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून निघून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी हिंसाच व जाळपोळ सुरु आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अनेक लोक बांगलादेशमध्ये अडकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला होता. त्याठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. जर सरन्यायाधीशांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना हसिनांप्रमाणे खुर्चीवरून खाली खेचले जाईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. (हेही वाचा - Bangladesh Crisis: बांगलादेशात अडकलेल्या भारतीय लोकांना विशेष विमानांद्वारे परत आणले जाईल; एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जनतेला आश्वासन)

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला होता. त्याठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हसिना यांच्याशी संगनमत करत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला होता.

ढाका येथील आंदोलकांनी सांगितले की, दिनाजपूरमध्ये चार हिंदू गावे जाळण्यात आली आहेत. लोक निराधार झाले असून त्यांना लपून राहावे लागत आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील हल्ले वाढले आहेत.  बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांस, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरित्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितपणे परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.