Australian Nurse Weight Loss: ऑस्ट्रेलियन नर्सने घटवले 45 Kg वजन; साध्या व्यायाम करत वापरली युक्ती

वय वर्षे 25 असलेल्या या नर्सने केलेले शारीरिक परिवर्तन आणि त्यासाठी तिने योजनलेली युक्ती केलेला व्यायाम हे सर्वच थक्क करणारे आहे. ज्यामुळे तिची जगभर चर्चा सुरु आहे.

Weight Loss | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Successful Weight Loss: वाढते वय आणि वाढते वजन अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. त्यात वयाला नियंत्रीत नाही करता येत. पण वजनाचे काय? ते तर नियंत्रित करता येऊ शकतं ना! शरीराचे वजन कमी करणे अनेकांसाठी मोठे आव्हान असते, काहींसाठी मात्र सामान्य प्रक्रिया. हे सर्व सांगण्याचे, बोलण्याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन नर्स (Australian Nurse). होय, ऑस्ट्रेलिया देशात मेलबर्न येथे राहणाऱ्या समंथा अब्र्यू नामक नर्सने थोडे थोडके नव्हे तर तब्बल 45 किलो इतके वजन कमी (Australian Nurse Remarkable Weight Loss) केले आहे. वय वर्षे 25 असलेल्या या नर्सने केलेले शारीरिक परिवर्तन आणि त्यासाठी तिने योजनलेली युक्ती केलेला व्यायाम हे सर्वच थक्क करणारे आहे. ज्यामुळे तिची जगभर चर्चा सुरु आहे.

वजन कमी करत बनवला सुडौल बांधा

समंथा अब्र्यू हिने योग्य व्यायाम आणि जीवनशैली यांचा अंगिकार करत मोठ्या संघर्षास सुरुवात केली. या संघर्षामध्ये तिचा विजय झाला असून तिने वजन कमी करत सुडौल बांधा अंगिकारला आहे. विशेष म्हणजे तिने केवळ एक वर्षभरामध्ये वजन कमी केले आहे. तिचा प्रवास एकूणच कल्याण वाढविण्यासाठी साध्या जीवनशैलीतील बदलांच्या परिवर्तनीय संभाव्यतेला अधोरेखित करतो. आपल्या परविर्तनाबद्दल बोलताना समंथा अब्रयू सांगते, एक वर्षभर चाललेल्या प्रयत्नात तिने दररोज चालणे आणि खाण्यापिण्याच्या सजग पद्धतींचा अवलंब करून आश्चर्यकारक परिवर्तन घडवून आणले आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची आवड, आळशी जीवनशैली, व्यायामाचा आभाव आदी कारणांमुळे समंथा एकदम लठ्ठ झाली होती. मात्र तिने केलेलेल्या दृढनिश्चयामुळे तिने 45 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी केले. (हेही वाचा, Richa Chadha ने केले weight Loss, फोटो पाहून व्हाल हैराण)

आगोदरचे वजन तब्बल 110 किलो

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, समंथा हिचे आगोदरचे वजन तब्बल 110 किलो होते. तिच्यासाठी लागणारे कपडेही सामान्य मापाचे नसत. त्यासाठी ते कपडे विशेष बनवून घ्यावे लागत. वाढते वजन त्यामुळे शारिरीक हालचालींवर येणारी मर्यादा यांमुळे ती प्रचंड थकली होती. तिला जगणे असहय्य झाले होते. तरीही तिची विस्कळीत जीवनशैली कायमच होती. दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान, अब्रेयूचे दैनंदिन चालणे, सुरुवातीला मानसिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने, जीवनशैलीतील महत्त्वपूर्ण बदलामध्ये विकसित झाले. (हेही वाचा, Weight Loss Drug: आता वजन कमी करणे होणार सोपे; बाजारात आले लठ्ठपणा कमी करणारे औषध, Wegovy ला मिळाली मंजुरी)

अब्रयू समंथा हिने वजन कमी करण्याचा निश्चय केला. त्यासाठी तिने स्वत:ला शिस्त लावून घेतली. आहारावर विशेष नियंत्रण मिळवले. आताही ती पारंपारिक पिझ्झा ऐवजी संतुलित पर्याय म्हणून साधे अन्न पसंत करते. आजघडीला ती साधारण 10,000 पावले म्हणजेच अंदाजे 5 मैल इतके चालते. साप्ताहिक चार जिम सेशन आणि अधूनमधून 5-किलोमीटर धावणे असा व्यायाम ती करते. उल्लेखनीय म्हणजे, ती आता आकार 8 मध्ये बसते आणि वजन 67 किलोग्रॅम आहे, तिच्या शरीरात आराम आणि आत्मविश्वासाची नवीन भावना व्यक्त करते. तिच्या कथा एकंदर आरोग्य आणि कल्याण मध्ये लक्षणीय सुधारणा वाढवण्यासाठी सामान्य जीवनशैली महत्तवाची ठरते.