Sex Strike in US: अमेरिकन स्त्रिया देत आहेत पुरुषांसोबत सेक्स न करण्याची धमकी; काय 'सेक्स स्ट्राइक' करण्यामागचं कारण, जाणून घ्या

अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध होत आहे.

Sex Strike प्रतिकात्मक फोटो (PC - Facebook)

Sex Strike in US: अमेरिकन स्त्रिया पुरुषांसोबत सेक्स न करण्याची धमकी देत ​​आहेत. त्यांनी 'सेक्स स्ट्राइक' (Sex Strike) केला आहे. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आला आहे. ज्यामुळे 26 राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी मिळाली आहे.

गर्भपाताचा अधिकार फेडरल कायदा होईपर्यंत महिलांना पुरुषांसोबत लैंगिक संबंधांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर देशभरात सेक्स स्ट्राइकची मागणी जोर धरू लागली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, "अमेरिकेच्या महिलांनो ही शपथ घ्या, कारण आम्ही अनपेक्षित गर्भधारणा ठेऊ शकत नाही. म्हणूनचं आम्ही कोणत्याही पुरुषाशी, अगदी आमच्या पतींसोबतही लैंगिक संबंध ठेवणार नाही. जोपर्यंत आम्हाला गर्भवती व्हायची इच्छा नाही." (हेही वाचा - काय सांगता? 40 वर्षांच्या महिलेने दिले 44 मुलांना जन्म; पतीने सोडल्यानंतर एकटी करत आहे सांभाळ)

सोशल मीडियावर #SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग -

आणखी एका युजरने सांगितले की, "मी न्यूयॉर्कमध्ये राहते आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. मी अशा लोकांचा शोध घेत आहे जे सेक्स स्ट्राइकचे समर्थन करत आहेत. हीच आमची ताकद आहे. जोपर्यंत गर्भपाताचा अधिकार फेडरल कायदा होत नाही तोपर्यंत सेक्स करू नका." #SexStrike सोबत #abstinence देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. "जोपर्यंत महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत," असे म्हणत आणखी एका महिलेने देशव्यापी सेक्स स्ट्राइकची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोकही रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. अॅरिझोना कॅपिटलच्या बाहेरील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. निदर्शनामुळे खासदारांना काही काळ इमारतीच्या आत तळघरात राहावे लागले.