Afghanistan Flash Floods: मुसळधार पावसामुळे अफगानिस्तानमध्ये 50 जणांचा मृत्यू (Watch Video)
घोरमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे 2,500 कुटुंबे, शेकडो हेक्टर शेतजमीन आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
Afghanistan Flash Floods: अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात आलेल्या विनाशकारी पुरामुळे(Afghanistan Flood) महिला आणि मुलांसह किमान 50 जणांना आपला जीव गमवावा लागला, असे खामा प्रेस न्यूज एजन्सीने शनिवारी सांगितले. घोरमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या प्रदेशात अचानक पूर आला. सुमारे 2,500 कुटुंबे, शेकडो हेक्टर शेतजमीन आणि फळबागा, शेकडो पूल यासह या भागातील विविध घरे वाहून गेली. घोर प्रांत अक्षरश: नष्ट झाला आहे. (हेही वाचा:Indonesia Flood Updates: इंडोनेशियामध्ये महापूर, 50 मृत, 27 बेपत्ता; मदत आणि बचाव कार्य सुरु)
हजारो प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. असंख्य वाहने पुरात वाहून गेली आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घोर-हेरत महामार्गासह, या प्रांतातील बहुतांश जिल्ह्यांतील वाहतूक मार्ग विस्कळीत झाली आहे. बाघलान प्रांत आणि अफगाणिस्तानमधील इतर अनेक प्रांतांमध्ये अचानक आलेल्या पुराने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या जलप्रलयामुळे बागलान आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. अहवाल सूचित करतात की पुरामुळे घरे आणि पायाभूत सुविधांचा नाश झाला आहे. वाहतूक मार्ग अवरोधित केले गेले आहेत.